मुख्य बातम्या

कॉंग्रेसच्या दोन आमदारांचा राजीनामा,सायंकाळी होणार भाजपाप्रवेश

0

टीम महाराष्ट्र देशा- काँग्रेसच्या दोन आमदारांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. भाजपाध्यक्ष अमित शहा यांची भेट होताच, आमदार सुभाष शिरोडकर व दयानंद सोपटे यांनी आपला राजीनामा दिला. त्यामुळे गोवाच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

गोव्यातील काँग्रेसचे आमदार सुभाष शिरोडकर व दयानंद सोपटे यांनी आज भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर, लगेचच त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. या आमदारासोबत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, मंत्री विश्वजित राणे व केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक हेही दिल्लीत आहेत.

Loading...

दरम्यान,आमच्यासोबत आणखी 2 ते 3 आमदार भाजपात येतील, असेही सुभाष शिरोडकर यांनी म्हटले आहे. त्यामुळे, गोव्यात सत्ता स्थापनेचे स्वप्न पाहणाऱ्या काँग्रेसमध्येच फूट पडल्याचे दिसते. काँग्रेसचे हे दोन्ही आमदार आज सायंकाळी भाजपात प्रवेश करणार आहेत.

नाराज भाजप आमदार आशिष देशमुखांचा पक्षाला अखेर राम-राम

Loading...

आजपासून अलाहाबादची ओळख ‘प्रगायराज’; योगीसरकारचा निर्णय

Previous article

अक्षय कुमारच्या व्हायरल लुकची चर्चा सोशल मीडियावर ‘हाऊसफुल’

Next article

You may also like

Comments

Comments are closed.