Royal Entertainmentमुख्य बातम्या

ट्विटरचा मोठा निर्णय, ट्विट ‘कॉपी-पेस्ट’ करणाऱ्यांवर बसणार लगाम!

0

मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरने एक मोठा निर्णय घेतला ज्यामुळे सर्व पक्ष आणि संस्थांमध्ये काम करणाऱ्या आयटी सेल्सचा त्रास वाढणार आहे. ट्विटरने कॉपी-पेस्ट केलेले ट्विट हाईड करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच जर आपण एखाद्याचे ट्विट काॅपी करून पेस्ट करत असाल किंवा एकच ट्विट अनेक लोक आपल्या नावे ट्विट करत असतील तर असे ट्विट ट्विटरकडून लोकांच्या (यूजरच्या) टाइमलाइनवरून हाइड करण्यात येणार आहेत.
ट्विटरने ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे आणि त्यासोबत स्पष्टीकरणही दिले आहे. ट्विटरने म्हटले आहे की, गेल्या काही वर्षांत त्याच्या प्लटफाॅर्मवर (व्यासपीठ) कॉपी-पेस्ट ‘copypasta ‘ ट्वीटच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. बरेच लोक इतराचे ट्विट कॉपी करून आपल्या टाइमलाइनवर ट्वीट करत असल्याचे आढळून आले आहे.

We’ve seen an increase in ‘copypasta,’ an attempt by many accounts to copy, paste, and Tweet the same phrase.
When we see this behavior, we may limit the visibility of the Tweets. https://t.co/OCVudJPXPm
— Twitter Comms (@TwitterComms) August 27, 2020

अशा परिस्थितीत आम्ही अशा ट्विटची व्हिजिबलिटी (visibility) कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्विटरने आपल्या नवीन पॉलिसीमध्ये काॅपी-पेस्ट  ‘copypasta ‘ ट्वीटचाही समावेश केला आहे. दरम्यान, ऑनलाइन जगात डुप्लिकेट कंटेंन्टसाठी काॅपी-पेस्टचा ‘copypasta ‘ अधिक वापर केला जात आहे.
ट्विटरने मोबाइल अ‍ॅपमध्ये एक फीचरदेखील अॅड केले आहे, जेथे आपण आपले ट्विट कॉपी करण्याचा पर्याय बंद करू शकता. त्याचबरोबर ट्विटर कंपनीने अलीकडेच रिट्विट विथ कोट (Retweet with quote)हे फीचर देखील उपलब्ध करून दिले आहे.
काॅपी-पेस्ट ट्विटचा अधिक वापर हा स्पॅमिंग आणि कॅम्पेन (Spamming and campaign) साठी केला जातो. बर्‍याचदा आपण पाहिले असेल की हजारो अकाउंटवरून एकसारखेच ट्वीट केले जातात. हे सर्व विशिष्ट व्यक्ती किंवा संस्थेला ट्रेंड करण्यासाठी आणि लक्ष्यित करण्यासाठी केले जाते. याचा सर्वाधिक वापर राजकीय प्रचार करण्यासाठी केला जातो.
काॅपी-पेस्ट ट्विटचे नुकसान म्हणजे एखाद्याचा मूळ कन्टेंट त्याच्यानावे राहत नाही. लोक(यूजर)  मूळ कंन्टेंट काॅपी करून आपल्या नावे ट्विट करून टाकतात. अशामुळे मूळ कन्टेंट क्रिएटरला कमी आणि काॅपी-पेस्ट करणाऱ्यालाच अधिक फायदा होतो.
The post ट्विटरचा मोठा निर्णय, ट्विट ‘कॉपी-पेस्ट’ करणाऱ्यांवर बसणार लगाम! appeared first on Dainik Prabhat.

व्हिवो कंपनीचे 2 स्मार्टफोन लॉन्च, कमी किंमतीत मिळणार धमाकेदार फीचर्स

Previous article

टिक-टॉक खरेदी करण्यासाठी स्पर्धा वाढली

Next article

You may also like

Comments

Comments are closed.