Royal politicsटॉप पोस्ट

पोलिसांनी गाडीची ओरिजनल कागदपत्रे मागितली तर त्यांना ही बातमी दाखवा

0

केंद्र सरकारने ड्रायव्हिंग लायसन्स, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट व इतर कागदपत्रांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने राज्यातील वाहतूक विभागाला तसेच ट्रॅफिक पोलिसांना ई-कागदपत्रे स्विकारण्यास सांगितले आहे. केंद्र सरकारने या बाबतीत काल (9 आॅगस्ट) राज्यांना सूचना पाठवली आहे.

आता या निर्णयाने डिजीलाॅकर आणि एमपरिवहन या अॅपमध्ये असणारी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, ड्रायव्हिंग लायसन्स, गाड्यांच्या इन्शुरन्सची कागदपत्रे इ. कागदपत्रे ग्राह्य धरली जाणार आहेत. कोणत्याही ड्रायव्हरकडून तपासणीसाठी ओरिजनल कागदपत्रे घेतली जाऊ नये असे सांगण्यात आले आहे.

Loading...

ट्रॅफिक पोलिस आता, त्यांच्या जवळ असलेल्या मोबाईल द्वारे देखील गाडी अथवा चालकाची माहिती डाटाबेस काढू शकतात. वेरिफिकेशनसाठी ओरिजनल डॉक्यूमेंट्सची गरज नाही.

इन्फाॅर्मेशन टेक्नोलाॅजी अॅक्ट 2000 नुसार, डिजीलाॅकरमधील डिजिटल कागदपत्रे ही ओरिजनल कागदपत्रे म्हणूनच ग्राह्य धरली जातात.

तसेच, मोटर वेहिक्लस अॅक्ट 1988 आणि सेंट्रल मोटर वेहिक्लस 1989 नियमानुसार, जर कोणी पोलिस अथवा अधिकाऱ्याने गाडीच्या मालकाला किंवा ड्रायव्हरला लायसन्स अथवा रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मागितले तर ते दाखवणे अऩिवर्य आहे.

डिजीलाॅकर आणि एमपरिवहनमध्ये कागदपत्रे कशी टाकायची ?

तुम्ही देखील तुमच्या मोबाईलमध्ये लायसन्स अथवा आरसीची डिजिटल काॅपी ठेऊ शकता. यासाठी तुम्हाला डिजीलॉकर (DigiLocker) किंवा एमपरिवहन (mParivahan) अॅप डाऊनलोड करावा लागले. डिजीलाॅकर अथवा एमपरिवहन अॅप डाउनलोड करून त्याला आधार कार्डशी जोडून ऑथेन्टिकेट करावे लागेल.

समजा, तुम्ही एमपरिवहन अॅप डाउनलोड केले. त्यानंतर त्यावर साईनइप करावे लागेल. साईनअपसाठी तुम्हाला मोबाईल नंबर द्यावा लागेल. त्यानंतर त्या मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. ओटीपी टाकून तुम्ही वेरिफिकेशन करू शकता.

तुम्हाला लाॅगइनसाठी यूजर नेम आणि पासवर्ड सेट करावा लागेल. त्यानंतर तुमचे एमपरिवहन अकाऊंट बनेल व तुम्ही डिजीलाॅकरमध्ये तुमचे डाॅक्यूमेंट्स ठेऊ शकता.

Loading...

Batti Gul Meter Chalu Trailer : 54 लाखाचे लाइट बिल, कोर्ट लढाई आणि सामाजिक संदेश

Previous article

Fake News Alert : मोदी सरकार खरचं देत आहे का सुकन्या समृद्धि योजनेअंतर्गत मुलींना 10 हजाराचा चेक ?

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *