Royal politicsटॉप पोस्ट

खड्ड्यात गेलेल्या मुंबई-गोवा एक्सप्रेस हायवेचे हे आहे सत्य, जाणून घ्या

0

राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई आणि देशभरात पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोवा या राज्याला जोडणार्‍या मुंबई – गोवा एक्सप्रेस हायवे गेल्या अनेक वर्षापासून नुसतीच चाळण होऊन बसला आहे. राष्ट्रीय महामार्ग असलेल्या या रस्त्याची स्थिती इतकी वाईट आहे की प्रवासासाठी निघालेल्या माणसांची हाडेच खिळखिळी होऊन येतात.

राष्ट्रीय महामार्ग 17 म्हणून ओळखल्या जाणार्‍या या  हायवे चे गेल्या 7 वर्षापासून चौपदरी करणाचे काम सुरू आहे पण ते अजून पूर्ण झालेच नाही. या हायवेची सर्वात वाईट अवस्था रत्नागिरी ते सिंधुदुर्ग या 289 किलोमीटर मार्गाची आहे, या हायवे चे 4 वेगवेगळे भाग करून ते विविध कंत्राट दर कंपन्यांना दुरूस्ती साठी दिले आहेत. परंतू काम अजून काही मीटर सुद्धा पुढे सरकले नाही. जो पर्यंत या हायवेच्या चौपदरी करणाचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत या हायवे ची देखभाल करण्याची जबाबदारी या कंत्राटदार कंपन्यांची असणार आहे. परंतू या कडे पूर्ण दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.

Loading...

या भयानक मृत्यूचे दर असलेल्या रस्त्यावर अपघातांची संख्या काही कमी नाही. फक्त एका वर्षात म्हणजे 2017 मध्ये 450 किलो मीटर च्या अंतरात 873 अपघातांची नोंद आहे. यात जखमींची संख्या तब्बल 1300 च्या आसपास आहे. आणि मृत व्यक्तींची संख्या 100-110 च्या आसपास आहे. असे असले तरी नोंद न झालेल्या अपघातांची संख्या देखील बरीच जास्त आहे. परंतू अनेक अपघात नागरिक आपापसात मिटवितात. 

या खाड्यात गेलेल्या हायवे वर मुंबई ते गोवा असे तब्बल 7 टोल नाके आहेत. हा हायवे जिथून सुरू होतो तर संपेपर्यंत एक 4 चाकी वाहनाला 500 ते 600 रुपये एवढा टोल भरावा लागतो.  परंतू रस्ता घेण्यात येणार्‍या टोल च्या मनाने अत्यंत खराब स्थितीत आहे. हे खड्डे दीड ते दोन फुट खोल आहेत. रस्त्यावर गाडी चालवताना खड्डे चुकवण्यातच कित्येक वाहनांचा अपघात झाला आहे.  तर रोज प्रवास करणार्‍या प्रवाशांना शरीराच्या अनेक दुखण्याणा सामोरे जावे लागत आहे. गेल्या 7 वर्षापासून हाच त्रास सहन करावा लागत असल्याचे प्रवासींकडून सांगण्यात येत आहे. यामुळे प्रवाशी चांगलेच संतप्त झाले आहेत.

वाहन चालकांकडून होणार्‍या उल्लंघांनामुळे मागील वर्षी पोलिसांकडून 1 हजार 504 चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तर यातून तब्बल 2 कोटी 3 लाख 47 हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

महसूल आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी 15 डिसेंबर 2017 पर्यंत महाराष्ट्र खड्डे मुक्त करण्याचा निर्णय घेतला होता. या आधी देखील अनेक वेळा खड्डे मुक्त महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता मागील वर्षी दिलेल्या आश्वासनाला 7 महीने उलटून जातील परंतू अजून महाराष्ट्र पूर्णपणे खड्डे मुक्त झाला नाही. उलट खड्डे युक्त झाला. महाराष्ट्रातील रस्त्याची दुर्दशा झाली आहे.

केंद्रीय रस्ते आणि दळणवळण मंत्री नितिन गडकरी यांनी फेब्रुवारी महिन्यात “मुंबई-गोवा हायवे मार्च 2019 मध्ये पूर्ण होईल, झाडे तोडण्यासाठी न मिळणारी मान्यता आणि रस्त्याच्या रुंदी कारणावरून होणारे दुमत यामुळे रस्त्याच्या चौपदरी करणाचे काम रखडले आहे. “

पनवेल ते इंदापूर या 84 किलो मीटरच्या मार्गातील 10 हजार 509 इतकी झाडे तोडण्यात येणार आहेत. यातील तब्बल 5 हजार 462 झाडे आधीच तोडण्यात आली आहे.

Loading...

Mulk Trailer: प्रत्येक मुसलमान हा देशद्रोही नसतो, हा थ्रिलिंग कोर्ट रूम ड्रामा तुम्हाला विचार करायला भाग पाडेल

Previous article

कोण होता मुन्ना बजरंगी? ज्याची उत्तर प्रदेशमधील जेलमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *