मुख्य बातम्या

मुंबई-ठाण्यात परवडणारी घरं उभारणार ; जितेंद्र आव्हाडांची मोठी घोषणा

0

मायानगरी मुंबईत आपल्या स्वत:चं हक्काचं घर असावं, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्न करणार असल्याचं, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
म्हाडातर्फे मुंबई-ठाण्यात परवडणाऱ्या दरातील घरं उभारणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली. म्हाडा मुंबईतील मोकळ्या जागा खरेदी करून त्याजागी परवडणाऱ्या दरात घरं उभारणार असल्याचं आव्हाड म्हणाले.
जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अनेक मंत्री आपल्या पक्षाच्या कार्यालयात जनता दरबार घेतात. जितेंद्र आव्हाडांनी आज मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात जनता दरबार घेतला. यावेळी ते बोलत होते. पूर्व उपनगरातील विक्रोळी येथील टागोर आणि कन्नमवार नगर या भागात मोठ्या वसाहती उभ्या करण्याचा मानस गृहनिर्माण मंत्र्यांचा आहे. यासंदर्भात आव्हाड हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार आहेत. तसेच मुंबई उपनगरात मोकळे भूखंड ताब्यात घेणार आहे.

घर मिळाल्या नंतर त्या घरात निर्माण होणारा आनंद ….. त्यांचे आशीर्वाद …. हिच माझी धन दौलत …. हीच माझी शक्ती …असेच काम करण्याची आई भवानी शक्ती देवो #न्यायगरिबाला
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 14, 2020

Loading...

महत्वाच्या बातम्या :-

‘दिल्लीत पवारांना हाणले होते ते मंत्री जितेंद्र आव्हाड विसरलेले दिसताहेत’- भाजप आमदार
दिल्लीत एका तरुणाने पवारांना हाणले होतं हे आव्हाड विसरलेले दिसतायत ; भाजपचा आव्हाडांवर घणाघाती हल्ला
राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्या चिराग पासवानांवर रोहित पवार चिडले
दोषी प्रशांत भूषण यांना १ रुपया दंड, न भरल्यास ३ महिने तुरुंगवास
काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल ; गुलामनबी, खरगे यांना महासचिव पदावरून हटवले !

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. मुंबई-ठाण्यात परवडणारी घरं उभारणार ; जितेंद्र आव्हाडांची मोठी घोषणा InShorts Marathi.

Loading...

मोदीजींनी पुन्हा शेतकऱ्याच्या छातीवर तलवार चालवून त्याला रक्तबंबाळ केलंय – बच्चू कडु

Previous article

कांदा निर्यात बंदी म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिरावून घेण्याचा प्रकार ; निर्यातबंदी तात्काळ उठवा !

Next article

You may also like

Comments

Comments are closed.