Royal Entertainmentमुख्य बातम्या

लक्झरी लाईफ सोडून जॅकी श्रॉफ साठी चाळीत राहायला आली होती हि अभिनेत्री, आज जगतेय अशी लाईफ…..

0

बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ आपला वाढदिवस 1 फेब्रुवारीला साजरा करतो. जॅकी श्रॉफ यांचा जन्म 1 फेब्रुवारी 1957 रोजी महाराष्ट्रात झाला. 200 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेल्या जॅकी श्रॉफचे बालपण खूप संघर्षमय व कठीण होते. पण एक वेळ असा आला की जॅकीने सलग हिट चित्रपट दिले.
चित्रपटात दिसण्यापूर्वी जॅकीने मॉडेल म्हणूनही काम केले होते. जॅकीच्या चित्रपटांबद्दल तुम्ही बरेच काही ऐकलं असेल पण आज आम्ही तुम्हाला या अभिनेत्याच्या लव्ह लाईफबद्दल सांगणार आहोत. जेव्हा जैकीने प्रथम आयशाला (पत्नी) पाहिले तेव्हा ती 13 वर्षाची होती आणि शाळेच्या गणवेशात बसमध्ये बसलेली होती.
जॅकी न घाबरत आयशाकडे गेला आणि त्याने स्वत: बद्दल सांगितले. जॅकी पहिल्या नजरेतच आयशाची प्रेमात वेडा झाला होता. पुढच्या वेळी त्या दोघांची भेट एका रेकॉर्ड शॉपवर झाली. आयशाला काही रेकॉर्ड विकत घ्यायचे होते आणि जेव्हा जॅकीने त्यांना मदत करण्यास सांगितले तेव्हा आयशाला समजले की हा मुलगा स्वभावाने किती चांगला आहे.
आयशाने विचार केला होता की ती या माणसाशी लग्न करेल आणि नेमके हेच घडले. सुरुवातीच्या काळात जॅकी चाळमध्ये राहत होत जेव्हा दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरवात केली.दुसरीकडे आयशा एका मोठ्या श्रीमंत घरातली होती आणि तिची जीवनशैली जॅकीपेक्षा अगदी वेगळी आणि हटके होती. परंतु या दोघांमध्ये कधीच पैशाची किंमत नव्हती.
आयशा जॅकीबरोबर रस्त्यावर फिरत असे. त्याच्याबरोबर बसमध्ये प्रवास करत. दुसरी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे अशी की जॅकी आधीपासूनच दुसर्‍या एका कोणाशी संबंधात अडकलेला होता. जॅकीची मैत्रीण अमेरिकेत राहत होती आणि लवकरच भारतात परत येणार होती आणि त्याच्याशी लग्न करणार होती.
बर्‍याच विचारविनिमयानंतर जॅकीने त्याच्या गर्लफ्रेंडला सर्व काही सांगितले. जॅकीने आयशाला त्या मुलीविषयीही सर्व काही सांगितले. पण तोपर्यंत आयशा जॅकीच्या प्रेमात पडली होती. आयशाच्या सांगण्यावरून जॅकीने त्या मुलीला पत्र लिहिले.
आयशाची आई या लग्नासाठी तयार नव्हती –
त्याचवेळी जेव्हा दोघांनी एकमेकांशी लग्न करण्याचे ठरविले तेव्हा आयशाची आई या दोघांच्या लग्नाबाबत खूष नव्हती. तिने आपल्या मुलीला एक लक्झरी जीवनशैली दिली, त्यात आयशाच्या आईला असे वाटले की चाळमध्ये राहणाऱ्या मुलाशी लग्न करणे हे आयशासाठी योग्य नाही.
अखेरीस त्यांचे प्रेम जिंकले. 5 जून 1987 रोजी हे नाते विवाहात बदलले.आयशाने लग्नाच्या तीन वर्षानंतर टायगरला जन्म दिला. यानंतर कृष्णा श्रॉफचा जन्म झाला. आज जॅकी श्रॉफ जे काही आहे तो त्याचे सर्व काही श्रेय तो त्याची पत्नी आयशाला देतो.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
The post लक्झरी लाईफ सोडून जॅकी श्रॉफ साठी चाळीत राहायला आली होती हि अभिनेत्री, आज जगतेय अशी लाईफ….. appeared first on Marathi Entertainment.

MPSC च्या मुलाखतीत मुलीला विचारले हे ८ प्रश्न, मुलीने दिली अशी उत्तरे कि तिची झाली निवड…

Previous article

रोज सकाळी उठल्यानंतर १ वाटी भिजवलेले चणे खाल तर होणारे फायदे वाचून अवाक् व्हाल!

Next article

You may also like

Comments

Comments are closed.