मुख्य बातम्या

दहा-पंधरा वर्षांपूर्वी वर आलेले आम्हाला अक्कल शिकवायला लागलेत ; खडसेंचा फडणविसांवर हल्ला

0

दहा-पंधरा वर्षांपूर्वी पक्षात उदयाला आलेले नेते आता आम्हाला अक्कल शिकवायला लागले आहेत, अशा शब्दांत भाजप नेते एकनाथ खडसेंनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता टीका केलीये.
एकनाथ खडसे त्यांच्या 68 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बोलताना खडसेंनी स्वपक्षीय नेत्यांवर नाव न घेता जोरदार टीकास्त्र सोडलं आहेे.
पक्षाला प्रतिकूल परिस्थिती असतानाही गोपीनाथ मुंडे, भाऊसाहेब फुंडकर, नितीन गडकरी, गिरीश बापट, सुधीर मुनगंटीवार आणि मी अशा सर्व नेत्यांनी अतिशय कष्ट घेऊन पक्ष उभारणी केली, असं खडसेंनी सांगितलं.
दरम्यान, गेली चाळीस वर्षे मी पक्षाशी एकनिष्ठ राहिलो आहे. तरीही माझ्यावर अन्याय केल्याची भावना आणि संताप कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्याचा कधी तरी स्फोट होऊ शकतो असं मला वाटतं. भाजपसह सर्वच पक्षात मला मानणारे कार्यकर्ते आहेत. कोरोनाचं सावट दूर झाल्यावर मी सर्व कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेणार आहे. यासाठी नेहमीप्रमाणे सर्व राज्यभर दौरा करणार आहे, असं खडसेंनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या :-
मोदींनी इतक्या वर्षात 1800 रुपयांची नोट का काढली नाही? व्हायरल काकूनंतर काकांची मागणी
कौतुकास्पद काम ; मुंबईच्या डबेवाल्यांसाठी धावून आले रोहित पवार !
गणेश विसर्जन सोहळ्यानंतर पुणे पोलीसांनी मानले पुणेकरांचे आभार
लवकरच शालेय शिक्षणात शेती विषयाचा समावेश करणार ; मोदीसरकारचा विचार सुरू
शिरुरमधील धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश
inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. दहा-पंधरा वर्षांपूर्वी वर आलेले आम्हाला अक्कल शिकवायला लागलेत ; खडसेंचा फडणविसांवर हल्ला InShorts Marathi.

कोरोना चाचणीचे दर आणखी कमी करणार ; आरोग्यमंत्र्यांची महत्वाची घोषणा

Previous article

चीनला मोठा दणका ; PUBG सह 118 Mobile Apps वर आणली बंदी

Next article

You may also like

Comments

Comments are closed.