Royal Entertainmentमुख्य बातम्या

रिया चक्रवर्तीच्या या उत्तरावर भडकली अंकिता लोखंडे, म्हणाली जेव्हा आम्ही एकत्र होतो तेव्हा …

0

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यु ला दोन महिन्यांहून अधिक काळ उलटला आहे. मात्र अजूनही सुशांतच्या मृत्यूचे खरे कारण समोर आलेले नाही. त्यामुळे या प्रकरणाचा तपास सी बी आय कडे सोपवला आहे. त्यामुळे सी बी आय त्याच्या परीने या प्रकरणातील गुंता सोडवण्याचा प्रयत्न करीत आहेत. मागील काही दिवसात सुशांत चा कुक आणि त्याचा रूम मेट सिद्धार्थ सोबत पोलिसांनी चौकशी केली.
दरम्यान याप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्ती चा एक इंटरव्ह्यू समोर आला आहे. त्यामध्ये रिया तिचे स्पष्टीकरण देते. तर दुसरीकडे एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने तिचे व्यक्तव्य जारी करीत अनेक खुलासे केले. सुशांत सिंह राजपूत च्या मृत्यूनंतर अनेक गोष्टी अभिनेत्री रिया चक्रवर्ती च्या विरोधात समोर आल्या. याच गोष्टीचे स्पष्टीकरण देण्यासाठी अंकिताने तिच्या ट्विटर अकाऊंटवर एक मोठी पोस्ट शेअर केली.

Few Revelations on today..Follows #ITWILLCONTINUETILLWEGETJUSTICE pic.twitter.com/AQzSIITFe8
— Ankita lokhande (@anky1912) August 27, 2020

या पोस्टमध्ये अंकिताने लिहिले, सर्वात आधी मी तुम्हाला सांगू इच्छिते की २३ फेब्रुवारी २०१६ पर्यंत मी आणि सुशांत एकत्र होतो. तेव्हापर्यंत तर सुशांत कोणत्याही प्रकारच्या डिप्रेशनमध्ये नव्हता. शिवाय तो कोणत्या ही मानसोपचार तज्ञाला भेटला नव्हता. त्यावेळी तो एकदम ठीक होता. वेगळ्या झाल्यावर मी आणि सुशांत संपर्कात नव्हतो असे मी कुठल्याच इंटरव्ह्यूमध्ये म्हणाले नव्हते.
मणिकर्णिका या चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान मुकेश छाबडा याच्या इंस्टाग्राम पेजवर माझ्या पोस्टरवर कमेंट करत सुशांतने मला शुभेच्छा दिल्या होत्या आणि त्यावर मी थँक्यू असा रिप्लाय सुद्धा दिला होता. त्यामुळे माझ्या आणि सुशांत च्या फोनवर बोलण्याच्या गोष्टीबाबत रियाने केलेले आरोप पूर्णपणे खोटे आहेत.
अंकिता पुढे म्हणाली, जेव्हा एकत्र होतो त्यावेळी एकत्र स्वप्न पाहायचो, एकत्र प्रार्थना करायचो. जेव्हा जेव्हा मला रिया बद्दल विचारले गेले त्या वेळी नेहमी मला त्या दोघांच्या नात्या बद्दल काहीच माहित नाही असेच म्हटले आहे. शिवाय मी कधीच संपर्क करण्याचा प्रयत्नही केला नाही. मी त्या दोघांच्या मध्ये कधीच गेले नव्हते. मात्र आता सुशांतच आयुष्य राहिले नाही त्यामुळे मला मध्ये यावे लागले. अंकिता च्या घराचा ईएमआय सूशांतच्या खात्यातून जायचा याबाबत सुद्धा अंकिताने स्पष्टीकरण केले आहे.
अंकिताने पुढे लिहिले, मी सत्य सोबत आणि सुशांतच्या परिवारासोबत आहे मात्र रिया सोबत नाही. कोण दो*षी आहे हे त्याचा परिवार सुद्धा जाणतो. त्याच्याकडे चॅटस् आहे. अन्यही काही पुरावे आहेत जे खोटे नाहीत. मी कायम सुशांतच्या परिवाराचा साथ देईन. अंकिता आणि सुशांत सहा वर्षे एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. या दोघांची ओळख पवित्र रिश्ता या मालिकेच्या झाली होती.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !
The post रिया चक्रवर्तीच्या या उत्तरावर भडकली अंकिता लोखंडे, म्हणाली जेव्हा आम्ही एकत्र होतो तेव्हा … appeared first on BollyReport.

सुशांतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्तीचा पहिल्यांदाच इंटरव्हीव, केला ह्या गोष्टीचा सणसणीत खुलासा !

Previous article

सी. बी. आयच्या भीतीने सुशांत सिंह राजपूत प्रकारणात हे दोघे माफीचे साक्षीदार व्हायला तयार, सी. बी. आयला दिली ही माहिती !

Next article

You may also like

Comments

Comments are closed.