Royal Entertainmentमुख्य बातम्या

सुशांतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्तीचा पहिल्यांदाच इंटरव्हीव, केला ह्या गोष्टीचा सणसणीत खुलासा !

0

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत च्या आ*त्म*ह*त्ये*चा तपास सी बी आय ची टिम गेले सात दिवस करत आहे. दरम्यान पहिल्यांदाच रिया चक्रवर्तीने एका न्यूज चॅनेलला तिचा इंटरव्यू दिला व तिच्या मनातील गोष्ट त्या न्युज चॅनल ला सांगितली. या इंटरव्ह्यूमध्ये रिया ने सांगितले की सुशांत ला फ्लाईट मध्ये बसायला भीती वाटायची. त्यामुळे तो फ्लाईट मध्ये बसण्यापूर्वी मोडाफिनील नावाचे औषध घ्यायचा.
रियाने दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर २०१९ मध्य युरोप टूर ला जाताना फ्लाईट मध्ये बसण्यापूर्वी सुद्धा सुशांतने हे औषध घेतले होते. मोडाफिनील हे औषध अधिक तर जास्त झोप यावी या आजारासाठी घेतले जाते.
इंडिया टुडे शी बोलताना रियाने युरोप टूरच्या काही आठवणी सांगितल्या. जेव्हा आम्ही युरोप टूरला जात होतो त्या वेळेस फ्लाईटने जेव्हा उडान घेतले. त्यावेळेस शांतीला म्हणाला की मला विमानात भीती वाटते. त्यावेळी त्याने डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मोडाफिनील हे औषध घेतले. जेव्हा आम्ही पॅरिसला पोहोचलो त्यावेळी तो तीन दिवस रूममधून बाहेर आला नाही. मात्र ट्रीप सुरु होण्यापूर्वी तो खूप खुश होता. त्यावेळी तो रियाला म्हणाला होता की तो या ट्रीपसाठी खूप एक्सायटेड आहे. कारण तो तेथे त्याचे असे काही पैलू दाखवू शकतो जे तो मुंबईत राहून दाखवू शकत नव्हता.
त्याला रस्त्यावरून चालायचे होते रस्त्यावर चालताना मस्ती करायची होती हे तो भारतात राहून करू शकत नव्हता. मला स्वतःला समजत नाही आहे की नंतर पुढे नक्की काय झाले? रिया ने पुढे सांगितले की स्विझरलँड मध्ये सुद्धा सुशांत एकदम ठीक होता. एनर्जेटिक होता. आम्ही इटलीला गेल्यावर गॉथिक हॉटेलमध्ये थांबलो. या हॉटेलच्या बुकिंग बाबत आम्हाला माहीत नव्हते. आमच्या खोलीत घुमटाकार रचना होती जी मला मुळीच आवडली नाही.
मी सुशांत ला म्हणाले की आपण रूम चेंज करून घेऊया मात्र तो म्हणाला की आपण इथेच थांबूयात. तेथे त्याला काहीतरी आहे असे वाटत होते मात्र मी त्याला ते वाईट स्वप्न असेल असे म्हणाली. कारण अशा ठिकाणी लोकांच्या मनात असे विचार येऊ शकतात असे मला वाटले होते. मी त्याला अनेकदा तो रुम चेंज करण्याचा सल्ला देत होती मात्र त्याने माझे जरा देखील ऐकले नाही.
तेथे त्याची तब्येत बिघडायला लागली आणि त्याला एंग्जाइटी अटॅक येऊ लागले होते. जेव्हा मी त्याला विचारले काय झाले त्यावेळेस तो म्हणाला २०१३ मध्ये मी डिप्रेशन मध्ये गेलो होतो त्यावेळेस हरीश शेट्टी नावाच्या मानसोपचार तज्ञाकडे उच्चार घेतले होते. हरीश शेट्टीनेच त्याला फ्लाईट मध्ये बसण्यापूर्वी मोडाफिनील घेण्याचा सल्ला दिला होता. त्याच्यामते तेव्हापासून तो एकदम ठीक होता. त्यानंतर त्याची हालत बिघडायला लागली आणि आम्ही ती ट्रीप अर्धवट सोडून भारतात परत आलो.
जेव्हा रियाला विचारले गेले की ती सुशांत वर प्रेम करायची तरीही ट्रीप ला जाताना ती तिचा भाऊ शौविकला का सोबत घेऊन गेली. तेव्हा रियाने उत्तर दिले की, सुशांत व शौविकची जबरदस्त बॉण्डिंग होती. आम्ही तर मजे मध्ये शौविकला माझी सवत म्हणून हाक मारायचो. सुशांत, मी आणि शौविक आमच्या रियालीस्टिक कंपनीमध्ये पार्टनर होतो. ही कंपनी आर्टिफिशिअल इंटेलिजंट वर आधारित होती.

#RheaChakraborty in the hot seat. No questions spared. Rajdeep questions her on the infamous Europe trip and #Sushant’s mental health. #IndiaTodayGrillsRhea @SardesaiRajdeepWatch the full interview tonight at 9 PM on India Today TV. pic.twitter.com/yQEkBMcKCl
— IndiaToday (@IndiaToday) August 27, 2020

सुशांतने स्वतः या कंपनीचे नाव माझ्या नावावरून ठेवले होते. या कंपनीत पार्टनर होण्यासाठी प्रत्येकाने ३३ हजार रुपये भरले होते. शौविक बेरोजगार होता त्यामुळे त्याचे पैसे मी भरले. तो कैटची तयारी करत होता मात्र तो आम्हाला संलग्न होईल की नाही याची त्याला खात्री नव्हती. त्याला युरोप ट्रीप ला घेऊन जाण्यास सुशांतने फोर्स केला होता. सुशांत पैसे खर्च करण्याबाबत जेव्हा रियाला विचारले गेले. त्यावेळी ती म्हणाली मला एका फॅशनच्या शूट साठी पॅरिस ला जायचे होते. यासाठीचे तिकेट्स कंपनीने पाठवले होते.
त्यावेळी सुशांतने सांगितले की ही संधी ट्रीप म्हणून एन्जॉय करूयात. यासाठी त्याने ते तिकीट कॅन्सल करायला लावले. आणि त्याने स्वतः फर्स्ट क्लास चे तिकीट बुक केले. आणि या तिकिटांसोबत हॉटेल्सचा वगैरे खर्चसुद्धा केला. त्याला सर्वकाही करायची इच्छा होती यासाठी मलासुद्धा कोणताच प्रॉब्लेम नव्हता. मात्र तो खूप खर्च करत होता या गोष्टीची मला खूप भीती वाटत होती कारण मला असे वाटत होते की ही ट्रिप खूपच महागडी झाली आहे. मात्र त्याने त्याला हवे तेच केले. त्याची इच्छा होती त्यामुळे मी त्याला कोणतेही प्रश्न सुद्धा विचारू शकत नव्हते.
याआधी तो त्याच्या ६ मित्रांसोबत थायलँड टूरला गेला होता. त्यावेळी त्याने प्रायव्हेट जेट बुक करून ७० लाख रुपये खर्च केले होते. त्यामुळे असे म्हणू नये की तो केवळ माझ्यावरच पैसे खर्च करत होता. तो तसाच माणूस होता तो एका स्टार प्रमाणे जीवन जगत होता. त्याला राजाप्रमाणे जगण्यास आवडायचे. मी सुशांतच्या जीवावर पैसे खर्च करत नव्हती. आम्ही एखाद्या कपल प्रमाणे राहत होतो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !
The post सुशांतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्तीचा पहिल्यांदाच इंटरव्हीव, केला ह्या गोष्टीचा सणसणीत खुलासा ! appeared first on BollyReport.

अंकिता लोखंडेच्या अर्ध्या घरावरती सुशांतचे कुटुंबीय कधीही घेऊ शकतात ताबा, जाणून घ्या काय आहे कारण !

Previous article

रिया चक्रवर्तीच्या या उत्तरावर भडकली अंकिता लोखंडे, म्हणाली जेव्हा आम्ही एकत्र होतो तेव्हा …

Next article

You may also like

Comments

Comments are closed.