Royal Entertainmentमुख्य बातम्या

कसलंही पित्त असूद्या या साध्या घरगुती उपचाराने मिळवा त्याच्यापासून सदैव मुक्ती, जाणून घ्या !

0

आज कालचा धावपळीच्या दुनियेत लोकांना घरचे सकस अन्न खाण्यास तथा बनवण्यास पुरेसा वेळ नाही. त्यामुळे वेळेची बचत व्हावी व झटपट काहीतरी खायला मिळावे या हेतूने कित्येक जण बाहेरच्या खाण्याचा मार्ग निवडतात. मात्र असे केल्यामुळे अनेकदा अपचन, पित्त, पोट दुखी यांसारख्या त्रासाला सामोरे जावे लागते.
साधारणपणे तेलकट किंवा मसालेदार पदार्थांचे अधिक सेवन केल्यामुळे ॲसिडिटी वाढते. त्यामुळे मळमळ, अपचन, अंगाला पुरळ येणे किंवा खाज येणे यांसारखे प्रकार होतात. प्रत्येक व्यक्तीला ॲसिडिटीचा वेगवेगळ्या प्रकारचा त्रास होतो. तसेच पित्त होण्याचे किंवा पित्त अंगावर उठण्याचे वेगवेगळे कारणे व प्रकार आहेत.

काही लोकांना तर साधे चहा किंवा पोहे घेतल्याने सुद्धा पित्त उसळते. त्यामुळे लोक चहा पिणे सुद्धा टाळतात. हे पित्त येऊ नये किंवा पित्ता पासून बचाव व्हावा यासाठी आज आम्ही तुम्हाला एक घरगुती उपाय सांगणार आहोत.
मसाल्याच्या पदार्थात अनेकदा वापरला जाणारा घटक म्हणजे धने. धडे हे वायुनाशक, पित्तनाशक तसेच शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करतात. सतत तहान लागत असेल तर धने चावून खावेत त्यामुळे तहान भागते. धन्यांमध्ये एंटीऑक्सीडेंट, कॉपर, सोडियम, पोटॅशियम यांचे प्रमाण अधिक असते. हे सर्व घटक मानवी शरीरास पोषक ठरतात.
म्हणून धने पूड एक चमचा घ्यावी, एक चमचा खडीसाखरेची पूड (तुम्हाला याचे प्रमाण वाढवायचे असेल किंवा ते अधिक दिवसांसाठी वापरायचे असेल तर जेवढ्या प्रमाणात धनेपूड घ्याल तेवढ्याच प्रमाणात खडीसाखरेची पूड देखील घ्यावी) हे मिश्रण एकजीव करावे. त्यात शतावरीच्या मुळांची पुड घालावी.
शतावरी मध्ये आइसोफ्लेमिन डीएस५ हे घटक असतात. याचा उपयोग पित्त नाशासाठी, अन्नपचनासाठी व शरीराच्या वाढीसाठी होतो. शतावरीची पूड अर्धा चमचा त्यात घाला. तयार झालेले हे चूर्ण रोज दुपारी जेवणापूर्वी उपाशीपोटी एक चमचा व रात्री जेवणानंतर एक चमचा घेऊन त्यावर कोमट पाणी प्यावे. हा उपाय सलग १५ दिवस करावा.
हा उपाय केल्यामुळे तुमचे पित्त कमी होईल, पोट साफ राहील, अजीर्ण कमी होईल. शिवाय पोट साफ झाले तर तुम्हाला अनेक त्रासांपासून मुक्ती मिळेल.
जर तुमच्या अंगावर पित्त उठले असेल तर त्यावर कांदा वाटून त्याचा रस लावावा. अंगावर पित्ताचे डाग उठले असतील तर ते कमी होतील. याशिवाय त्या डागांवर झेंडूचे पाने व झेंडूची फुले यांचे वाटण करून लावू शकतात त्यांने सुद्धा डाग कमी होतात.
तुम्हाला जर हा लेख आवडला असेल तर लाईक करून तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका.
The post कसलंही पित्त असूद्या या साध्या घरगुती उपचाराने मिळवा त्याच्यापासून सदैव मुक्ती, जाणून घ्या ! appeared first on BollyReport.

दीपिका पादुकोणने डिलिट केलेली व्हाट्सअँप चॅट एन सी बीला कशी मिळाली, जाणून घ्या !

Previous article

दररोज सकाळी ‘कोमट’ पाण्यासोबत गुळाचे सेवन करा मिळतील हे जबरदस्त फायदे !

Next article

You may also like

Comments

Comments are closed.