Royal Entertainmentमुख्य बातम्या

ज्या घरात असतात या १० वस्तू तिथे पैसा आणि सुख कधीच टिकत नाही..!

0

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार ज्या घरामध्ये या वस्तू असतात त्या घरात धन म्हणजेच पैसा कधीच टिकत नाही. या वस्तू कोणत्या आहेत या आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार आपल्या अनेक वस्तू असतात कि ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि याच वस्तू अडचणींच कारण बनतात.
मित्रांनो या वस्तू दिसताच आपण त्या हटवायला हव्यात. जेणेकरून या वस्तू असतात त्या आपल्या धन आणि सुखाला स्थायी रूपात निवास करू देत नाहीत. जर या वस्तू आपल्या घरात असतील तर आपल्या घरात पैशाला व सुखाला स्थायी रूपात वास करू देत नाहीत. तर जाणून घेऊया या कोणत्या वस्तू आहेत.
१. पहिली गोष्ट आहे कबुतराचं घरटं. ज्या घरामध्ये कबुतराचं घरटं निर्माण होत त्या घरामध्ये मोठं संकट येण्याची शक्यता असते.
२. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे मधमाशांचं पोळ. मित्रांनो असं पोळ जर तुमच्या घराच्या आसपास असेल तर ते अमंगलतेच सूचक असतं. आणि यामुळे एखादी मोठी दुर्घटना वा एखादा या[अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे असं हे पोळ सुद्धा आपण हटवायला हवं.
३. मित्रांनो तुमच्या घरात जर कोळ्याचं जाळ झालेलं असेल तर हि जाळी आपल्याला एखाद्या संकटामध्ये गुंतवत असतात. समस्या वाढत जातात आणि म्हणून अशी कोळ्याची जाळी सुद्धा आपण हटवायला हवीत.
४. तुटलेला ग्लास जर आपल्या घरामध्ये असेल तर हा आपल्या घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक निर्माण करतो.
५. तुमच्या जर घराच्या भिंतींमध्ये भेगा पडलेल्या असतील किंवा भिंतींचे पापुद्रे जर निघालेले असतील तर हे आपण ताबडतोब दुरुस्त केले पाहिजेत. कारण यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी होण्याची शक्यता असते. घरातील पैसा हा विनाकारण बरबाद होऊ शकतो.
६. तुमच्या घरात किंवा घराच्या आसपास वटवाघुळांचा वावर असेल तर त्यामुळे घरातील सदस्यांमध्ये अस्वस्थता निर्माण होते. एकटेपणाची भावना निर्माण होते, तसंच असं घर बर्बादीच्या दिशेने निघून जातं.
७. मित्रांनो आपल्या घरात जर ठिबकता नळ असेल, त्यातून जर थेम्ब थेम्ब पाणी गळत असेल तर असे नळ तात्काळ दुरुस्त करून घ्यायला हवेत. कारण हे नळ आपल्या घरात बरकत येऊ देत नाहीत. तुम्ही जो उद्योग व्यवसाय करताय त्यात प्रगती होत नाही.
८. तुमचं जे छत आहे त्या छतावरती तुम्ही जर नको असलेल्या वस्तू जमा करून ठेवल्या असतील तर अशा वस्तूंची देखील योग्य ती विल्हेवाट लावायला हवी. कारण या वस्तू आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा येऊ देत नाहीत.
९. तुमच्या घरात जर इलेकट्रोनिक उपकरणं पडलेली आहेत कि ती एकतर बंद आहेत किंवा खराब झालेली आहेत. तर अशी उपकरणं दुरुस्त करून घ्या किंवा ती दुरुस्त होत नसतील तर बाहेर टाकून दिलेली चांगली. कारण अशी उपकरणं सुद्धा आपल्या घरात सकारात्मक उर्जेला प्रवेश करण्यास अडथळा आणतात.
१०. मित्रांनो तुमच्या घराच्या आसपास किंवा घरात जर रोपटी असतील, तर अशा रोपट्यांना रोजच्या रोज पाणी देत चला. तसेच जी पान पिवळी पडलेली आहेत अशी पान तोडून ती फेकून देत चला. कारण आपण घराच्या आसपास जी झाड लावतो ती खरतर आपल्याला मोठ्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा देत असतात. मात्र त्यांची योग्य ती निगा आपण राखली जायला हवी.
तर मित्रांनो या १० गोष्टींचं जर तुम्ही पालन केलं तर आपल्या घरामध्ये धन असेल, पैसा असेल, सुख असेल या गोष्टी स्थायी रूपाने वास करू लागतात. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी व नातेवाईकांना शेअर नक्की करा.
टीप – वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.
The post ज्या घरात असतात या १० वस्तू तिथे पैसा आणि सुख कधीच टिकत नाही..! appeared first on DarjaMarathi.In.

बायडन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होताच कंगनाचे ‘मोठे’ भाकीत; म्हणाली…

Previous article

कपाटात चुकूनही ठेवू नका या 4 गोष्टी, अन्यथा येईल आर्थिक समस्या!!

Next article

You may also like

Comments

Comments are closed.