मुख्य बातम्या

“यांना फक्त दगडी मारायला मराठी माणूस पाहिजे” ; निलेश राणेंचा शिवसेनेवर जोरदार निशाणा

0

महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ठाकरे ब्रँडचे पतन होईल त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखात म्हटलं होतं. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते निलेश राणे यांनी एक किस्सा सांगत शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
“शिवसेनेत असताना असच एक दिवस आम्ही कुटुंब जेवायला एका ठिकाणी गेलो, आम्हाला कळलं की उद्धव ठाकरे तिथे आलेत, आम्ही भेटून निघालो पण बघितलं 90% त्यांचे मित्र अमराठी होते. यांना बाहेरगावी फिरायला सोबत अमराठीच लागतात… फक्त दगडी मारायला मराठी माणूस पाहिजे,” असं म्हणत निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
संजय राऊत यांच्या लक्षात आलं आहे की परिस्थिती अंगावर आली की फक्त मराठी अमराठी वाद लावून द्यायचा की लोक आपोआप स्वतःला वाटून घेतात, शिवसेनेचं काम सोप्प होतं. मराठी माणसाने आता तरी यांची चाल ओळखावी आणि संधी मिळताच ह्यांना आडवं करावं, असंही निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

१ किस्सा सांगतो, आम्ही शिवसेनेत असताना असाच एक दिवस आम्ही कुटुंब जेवायला एका ठिकाणी गेलो, आम्हाला कळलं की उद्धव ठाकरे तिथे आलेत, आम्ही भेटून निघालो पण बघितलं 90% त्यांचे मित्र अमराठी होते, यांना बाहेरगावी फिरायला सोबत अमराठीच लागतात… फक्त दगडी मारायला मराठी माणूस पाहिजे.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) September 13, 2020

महत्वाच्या बातम्या :-

उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख पडला महागात ; अब्रूनुकसानीचा कंगनाविरुद्ध अखेर गुन्हा दाखल
अनिल देशमुखांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार आहे का ?
‘कोरोना व्हायरसचा नाश झाला’, कोरोनाचा कहर वाढत असताना भाजपचा नेता बरळला
महाराष्ट्रात ठाकरे सरकारचे अत्याचार वाढलेत केंद्राने लवकर हस्तक्षेप करावा – कंगना राणौत
ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात आता कंगनाचीही चौकशी होणार ; गृहमंत्र्यांचे मुंबई पोलिसांना कडक आदेश

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. “यांना फक्त दगडी मारायला मराठी माणूस पाहिजे” ; निलेश राणेंचा शिवसेनेवर जोरदार निशाणा InShorts Marathi.

कंगनाचा विषय महाराष्ट्रात कोणी सुरू केला? चंद्रकांतदादांचा मुख्यमंत्र्यांना थेट सवाल

Previous article

‘तुम्ही फार मोठी चूक करताय… ‘ कंगनानं इशारा देत मुंबई सोडली

Next article

You may also like

Comments

Comments are closed.