Royal Entertainmentमुख्य बातम्या

नितळ तजेलदार त्वचेसाठी वापरा ‘या’ स्मार्ट टिप्स

0

आपला रंग गोरा असो, वा सावळा असो; त्वचा नितळ आणि तजेलदार असणे हे सौंदर्याचे महत्त्वाचे लक्षण आहे. त्वचा तजेलदार आणि नितळ राहण्यासाठी थोडी काळजी घ्यावी-
-स्नान करताना नियमित साबण वापरण्याऐवजी हिरव्या चणाडाळीचे पीठ व पिवळ्या चनाडाळीचे पीठ समप्रमाणात घेऊन दुधात भिजवून संपूर्ण अंगाला लावावे. चणाडाळीचे रोजचे पीठ म्हणजेच बेसन दुधात कालवून लावावे.
-दूध पावडर 1 टेबल स्पून, मध 2  स्पून, 1 चिमुटभर हळद पावडर आणि अर्धे लिंबू एकत्र करून चेहरा, मानेला आणि जर शिल्लक राहिले, तर हाताला चोळून लावावी. वाळल्यानंतर धुऊन टाकावी.
-कोळ व गोडे जिरे समप्रमाणात घेऊन दुधात पेस्ट करावी. त्यात थोडी मलई घालून चेहऱ्यावर लावून वीस मिनिटांनी धुवावे. हे मिश्रण आठवडयातून दोन वेळा लावावे.
-ओली हळद व मोहरी वाटून दररोज ब्लॅकहेडस/पिंपल्स झालेल्या ठिकाणी लावावी. हळूहळू ब्लॅकहेडस कमी होतात.
-ओट्‌सचे पीठ, चंदनाचे चूर्ण, 1  स्पून ओट व 1/4   स्पून चंदन पूड त्वचेवर चोळावी. थोडया वेळाने धुऊन टाकावे. कच्च्या बटाटयाच्या पातळ चकत्या कापून चेहऱ्यावर पसरून बारा-पंधरा मिनिटे शांत पडावे. नंतर धुऊन चेहरा टिपून घ्यावा. चेहरा मुलायम व स्निग्ध राहतो. ज्यांची त्वचा तेलकट आहे त्यांच्यासाठी  कृती उपयोगी आहे.
– चमचा ग्लिसरीनमध्ये हर्बल तेल किंवा आवळा तेल ते थेंब टाकून चेह-यावर लावावे. मुलायम मऊ त्वचा होण्यासाठी असे नियमित करावे. तोंड धुतल्यावर गुलाबपाणी चेहऱ्याला लावावे. त्वचा मृदू होते. ज्यांची त्वचा कोरडी आहे,  ही कृती लाभदायक आहे.
-लिंबू, अंडे एकत्र फेटून चेहऱ्यावर लावावे. साधारण वीस मिनिटांनी धुवावे.
-त्वचा मृदू, मुलायम, स्निग्ध व सतेज राहण्यासाठी दह्याने मसाज करावा.
– त्वचेसाठी मॉइश्‍चरायझर अत्यंत उपयुक्त ठरते. त्वचेचा ओलावा टिकवून बाहेरील वातावरणाचा त्वचेवर परिणाम होऊ न देणे यालाच त्वचेवरील मॉइश्‍चरायझर टिकवणे असे म्हणतात. घरातील काही वस्तू व काही विकत आणलेल्या पदार्थापासून घरीच मॉइश्‍चरायझर करून त्वचेला चमक आणता येते.
The post नितळ तजेलदार त्वचेसाठी वापरा ‘या’ स्मार्ट टिप्स appeared first on Dainik Prabhat.

चाहत्याने केलेल्या ‘या’ मागणीवर सोनू सूदने दिल भन्नाट उत्तर

Previous article

“मटार कचोरी’ विथ लो कॅलरिज…

Next article

You may also like

Comments

Comments are closed.