मुख्य बातम्या

ड्रग्स प्रकरणी बॉलीवूडचे हे 15 सुपरस्टार NCBच्या रडारवर ; होणार कसून चौकशी !

0

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर कलाविश्वातील अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. सुशांत आत्महत्येप्रकरणी आता पर्यंत अनेक जणांची चौकशी करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे घराणेशाही, गटबाजी या गोष्टींसाठी चर्चेत असणारा दिग्दर्शक करण जोहर देखील आता एनसीबीच्या रडारवर आहे. सुशांत आत्महत्या प्रकरणाची तपासणी करणारी एनसीबी यंत्रणा सध्या ड्रग्स ऍगलवर चौकशी करत आहे. त्यामुळे ३० जुलै २०१९ रोजी करण जोहरच्या घरी झालेल्या पार्टीची चौकशी एनसीबी करणार असल्याची शक्यता आहे.
३० जुलै २०१९ रोजी करणच्या घरी एक पार्टी झाली होती. या पार्टीमध्ये विकी कौशल, दीपिका पादुकोण, मलायका अरोरा, रणबीर कपूर अर्जुन कपूर, वरुण धवन, अयान मुखर्जी, झोया अख्तर यांसारखे कलाकार उपस्थित होते. या पार्टीचा व्हिडिओ टिक-टॉकवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.
दरम्यान, शुक्रवारी एनसीबीने ड्रग्ससंदर्भात मोठा खुलासा केला. १५ बॉलिवूड सेलिब्रिटी ड्रग्स प्रकरणी एनसीबीच्या रडारवर असल्याचं सांगण्यात येत आहे. या सर्वांची नावं अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या चौकशीनंतर समोर आली आहेत.
महत्वाच्या बातम्या :-

शिवसेना दाऊदला घाबरते ; रामदास आठवलेंचा खळबळजनक आरोप !
इतक्या पारदर्शक बदल्या यापूर्वी कधीच झाल्या नाहीत ; शिवसेनेचा भाजपला टोला
लवकरच शालेय शिक्षणात शेती विषयाचा समावेश करणार ; मोदीसरकारचा विचार सुरू
मोठी बातमी : जमावबंदीचं उल्लंघन केल्याप्रकरणी अजितदादांसह राष्ट्रवादीच्या ११ नेत्यांना नोटीस
माझी पण इच्छा आहे माझ्या नावावर अशी बिल्डिंग करावी ; शरद पवारांनी कंगनाची उडवली खिल्ली

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. ड्रग्स प्रकरणी बॉलीवूडचे हे 15 सुपरस्टार NCBच्या रडारवर ; होणार कसून चौकशी ! InShorts Marathi.

कंगना सोडून आता कोरोनाकडे लक्ष द्या ; फडणवीसांचा ठाकरे सरकारला सल्ला

Previous article

मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी तसूभरही मागे हटणार नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next article

You may also like

Comments

Comments are closed.