तंत्रज्ञानभारतमुख्य बातम्या

एटीएममधून पैसे काढण्यावर येणार बंधनं

0

एटीएममध्ये स्कीमर, हँकिंग करून अनेक ग्राहकांची फसवणूक झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. ही फसवणूक टाळण्यासाठी ‘स्टेट लेव्हल बँकर्स कमिटी’ने शिफारसी सुचवल्या आहेत. या शिफारसी लागू झाल्यास ग्राहकांना एटीएममधून पैसे काढण्यासाठी वेळ बंधनं येणार आहेत. एटीएमद्वारे होणाऱ्या दोन व्यवहारांमध्ये ग्राहकांना ६ ते १२ तासांचे अंतर ठेवावे लागणार आहे.

देशभरात एटीएमच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीच्या गुन्ह्यांची संख्या ९८० झाली होती. या घटनांना आळा घालण्यासाठी दिल्लीत १८ बँकांच्या प्रतिनिधींसोबत ‘स्टेट लेव्हल बँकर्स कमिटी’ने चर्चा केली. या बैठकीत एटीएम मशीनद्वारे होणारी फसवणूक, लूट रोखण्यासाठी अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात आली.

Loading...

या चर्चेतून एटीएमद्वारे होणाऱ्या दोन व्यवहारांमध्ये वेळेचे बंधन घालण्याचा मुद्दा समोर आला होता. एटीएमच्या दोन व्यवहारांमध्ये ६ ते १२ तासांचे अंतर ग्राहकांना ठेवावे लागणार आहे. त्यामुळे काही प्रमाणात ग्राहकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.

Loading...

सत्ता होती तेव्हा सुप्रिया ताई स्वतःशी संवाद करायच्या – फडणवीस

Previous article

पी. व्ही. सिंधू घेतली पंतप्रधान मोदींची भेट

Next article

You may also like

Comments

Comments are closed.