मुख्य बातम्या

कोल्हापुरात तूर्तास कडक लॉकडाऊन करणार नाही – पालकमंत्री सतेज पाटील

0

रुग्णांची संख्या वाढत आहे हे खरे असले तरी कोल्हापुरात तूर्तात लॉकडाऊन कडक करण्यात येणार नसल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी सायंकाळी स्पष्ट केले.
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत लॉकडाऊन कडक करण्याच्या हालचाली मुख्यमंत्री कार्यालयाच्या पातळीवर चर्चेत होत्या. त्याअनुषंगाने पालकमंत्री पाटील सोमवारी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्याशी यासंबंधी चर्चा करणार होते, परंतु ती चर्चा होऊ शकली नाही.
कोल्हापुरातही रुग्ण आणि मृत्यूसंख्या वाढल्याने संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारच्या पातळीवरच लॉकडाऊन कडक करण्याचा विचार सुरू आहे. त्याअनुषंगाने पालकमंत्री पाटील म्हणाले, रुग्णांना चांगले उपचार मिळावेत यासाठी जिल्हा प्रशासन सर्व पातळीवर प्रयत्नशील आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही जिल्ह्यात चांगले आहे.
त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करायला हव्यात, त्या आम्ही करत आहोत. त्यासाठी लॉकडाऊन करण्याची तूर्तास तरी आवश्यकता वाटत नाही. कोरोनाचा संसर्ग कमी होण्यासाठी नागरिकांनीच स्वयंशिस्त पाळावी, त्यांनी काळजी घ्यावी व अनावश्यक गर्दी टाळावी, सायंकाळनंतर अनावश्यक फिरणे टाळावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या :-
मोदींनी इतक्या वर्षात 1800 रुपयांची नोट का काढली नाही? व्हायरल काकूनंतर काकांची मागणी
राज्यात तब्बल १४,८८८ रुग्णांची वाढ , एकूण बाधितांचा आकडा ७,१८,७११वर
अनलॉक-4मध्ये राज्यात ‘हे’ सुरू आणि ‘हे’ बंद राहणार , वाचा सविस्तर
कोरोनाचा कहर सुरूच ! पुणे, मुंबई, ठाण्यात पुन्हा वाढू लागले रुग्ण !!
वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे ‘या’ जिल्ह्यातील व्यापाऱ्यांकडून पुन्हा लॉकडाऊनची मागणी
inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. कोल्हापुरात तूर्तास कडक लॉकडाऊन करणार नाही – पालकमंत्री सतेज पाटील InShorts Marathi.

माफ कर मित्रा, आम्ही तुला वाचवू शकलो नाही ; पांडुरंगच्या जाण्याने सत्यजीत तांबे झाले भावुक

Previous article

सांगलीतील लॉकडाऊनबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेणार – जयंत पाटील

Next article

You may also like

Comments

Comments are closed.