Royal Entertainmentटॉप पोस्ट

TRAILER :- सैराटचा रिमेक असलेल्या ‘धडक’चा ट्रेलर रिलीज

0

सैराट प्रर्दशित झाला आणि त्याने आख्या महाराष्ट्रला वेड लावलं. परश्या आणि आर्ची तर घराघरात पोहचले. आता त्याच सैराटचा हिंदी रिमेक असलेल्या ‘धडक’चा ट्रेलर रिलीज झाला आहे.

या चित्रपटात परश्याची भुमिका शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर तर आर्चीची भुमिका श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर साकारणार आहे. ईशानचा हा दूसरा चित्रपट असणार आहे. त्याने या आधी इराणी डायरेक्टर माजिद मजीदी यांच्या ‘बियॉन्ड द क्लाउड्स’ या चित्रपटाद्वारे डेब्यू केला होता. तर जान्हवीचा हा पहिलाच चित्रपट असणार आहे.

Loading...

ट्रेलरमधील कथानक हे राजस्थानमध्ये घडताना दिसत आहे त्यामुळे राजस्थानी भाषेतील डायलाॅग या चित्रपटात आहेत.  तसेच चित्रपटामध्ये ईशानचे नाव मधूकर आणि जान्हवीचे नाव पार्थवी आहे. तसेच जान्हवीच्या वडिलांची भुमिका अशुतोष राणा हे साकरणार आहेत.  झिंगाट हे गाणे लिरिक्स बदलून तसेच ठेवण्यात आले आहे.

मराठीमध्ये सैराटचे डायरेक्शन नागराज मंजुळे यांनी केले होते. मराठी फिल्म इंडस्ट्रीच चेंज करणार हा चित्रपट होता.

धडकचे डायरेक्शन शंशाक खैतान करणार आहे. शंशाक खैतानने या आधी ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ व ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ हे चित्रपट डायरेक्ट केले आहेत.  तसेच म्युजिक मराठी प्रमाणे अजय-अतुल यांचेच असणार आहे. तर प्रोडक्शन झी स्टुडिओ व धर्मा प्रोडक्शन यांचे असणार आहे.

सैराट 29 एप्रिल 2016 मध्ये महाराष्ट्रात रिलीज झाला होता.  ‘धडक’  20 जुलै रोजी संपुर्ण देशात रिलीज होणार आहे.

सैराटने मराठीमध्ये 110 करोड रूपयांची कमाई केली होती. मराठीमध्ये 100 करोडचा टप्पा पार करणारा सैराट पहिला चित्रपट होता.  त्यामुळे हिंदीमध्ये ‘धडक’ किती करोडची कमाई करणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

 

 

(PHOTO INPUT :- FACEBOOK/JANHVIKAPOOR)

Loading...

भारत बनलाय या आंतरराष्ट्रीय संघटनेचा संपूर्ण सदस्य; पहिल्यांदाच सहभागी होणार या संघटनेच्या परिषदेत

Previous article

लोकसेवा आयोगाची परीक्षा पास न होताच प्रशासकीय सेवेत होणार थेट भरती; केंद्र सरकारचा निर्णय

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *