मुख्य बातम्या

लॉकडाऊन हा विषय आता संपला ; राजेश टोपे यांचा मोठा खुलासा

0

‘करोना बाधितांची संख्या वाढतेय, हा काळजी वाटणाराच विषय आहे. त्यात दुमत काहीच नाही. त्यामुळे याबाबत लोकांमध्ये प्रबोधन करून त्यांना शिक्षित करणे व सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे बंधनकारक करणे गरजेचे आहे.महाराष्ट्रात सार्वजनिक ठिकाणी जे मास्क वापरत नसतील, सोशल डिस्टन्सिंग पाळत नसतील, त्यांना कुठेतरी दंड लावावच लागेल. तशी परिस्थिती निर्माण झाली आहे,’ असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.
लॉकडाऊनवरही टोपे यांनी आपले स्पष्ट मत मांडले.महाराष्ट्रातील करोना बाधितांचा आकडा हा आज दहा लाखांच्या पुढे गेला आहे. त्याबाबत टोपे यांना विचारले असता ते म्हणाले, ‘करोनाची संख्या ही दहा लाखांच्या पुढे गेली असली तरी त्यामध्ये साडेसात लाख हे लोक बरे होऊन घरी गेले आहेत. दहा लाखांचा आकडा हा लक्षात ठेवण्यापेक्षा अॅक्टिव्ह पेशंट किती आहेत, हे लक्षात घ्यावे.
बंदच्या काळात आरोग्य सुविधा वाढवण्याच्या दृष्टिकोनातून कालावधी मिळतो. त्यामुळे जेथे जेथे स्थानिक प्रशासन, तेथील पालकमंत्री, लोकप्रतिनिधी यांना वाटत असेल, त्याठिकाणी ते छोट्या कालावधीचा जनता कर्फ्यू करण्याच्या दृष्टिकोनातून स्थानिक पातळीवर विचार करतात. परंतु संपूर्ण लॉकडाऊन करणे हा आता विषय राहिला नाही. आपण आता अनलॉक करण्याचे कामच टप्प्याटप्याने करीत आहोत.’

महत्वाच्या बातम्या :

चिंतेत वाढ करणारी बातमी ; देशात कोरोना रुग्णांची संख्या ४५ लाखांवर !
“उद्धव ठाकरेंनी अयोध्येला येऊ नये नाहीतर…” अयोध्येतील संतांकडून मुख्यमंत्र्यांना धमकी
संजय राऊतांनी मला उघड धमकी दिलीय ; कंगनाचा गंभीर आरोप
सूड बुद्धीने ठाकरे सरकार कंगनावर कारवाई करत आहे का ?
धनंजय मुंडेंनी घेतला कंगनाच्या वक्तव्याचा समाचार , म्हणतात..

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. लॉकडाऊन हा विषय आता संपला ; राजेश टोपे यांचा मोठा खुलासा InShorts Marathi.

मुंबईच्या महापौरांनी SRA सोसायटीमधील फ्लॅट बळकावलेत : किरीट सोमय्या

Previous article

मराठा आरक्षणाबाबत पुन्हा रस्त्यावर उतरावे लागले तरी चालेल ; शिवेंद्रराजे भोसले कडाडले

Next article

You may also like

Comments

Comments are closed.