मुख्य बातम्या

दशकांच्या प्रतीक्षेनंतर भारतात परतणार राम-लक्ष्मण- सीतेच्या चोरीला गेलेल्या मूर्ती

0

तामिळनाडू येथील विष्णुमंदिरातून १९७८ मध्ये चोरीला गेलेल्या विजयनगर कालखंडातील राम, सीता आणि लक्ष्मणाच्या अतिशय मौल्यवान आणि दुर्मिळ अशा तीन मूर्ती ब्रिटीश पोलिसांकडून लंडनमध्ये असणाऱ्या भारतीय वाणिज्य दूतावासाकडे सोपवण्यात आल्या आहेत.
या प्रसंगी लंडनमध्ये भारतीय उच्चायोग भवनमधील इंडिया हाऊसमध्ये एका औपचारिक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यामध्ये मेट्रोपोलिटल पोलीस दलातील अधिकारी, इंडिया हाऊसमधील कर्मचारी आणि केंद्रीय सांस्कृतिक- पर्यटन मंत्री प्रल्हाद सिंह पटेल हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाले होते.
मूर्ती सोपवल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यामध्ये पुजाऱ्यांकडून मूर्तींवर मंत्रोच्चारांसहित पूजा-अर्चा करण्यात आली. भारताकडे या मूर्ती परत येणं म्हणजे सांस्कृतिक वस्तूंची चोरी आणि तस्करी करण्यात आलेल्या कलाकृतींना पुन्हा मायदेशी आणण्यासाठीच्या भारत सरकारच्या प्रयत्नांना आलेलं यश आहे. भारताकडे सोपवण्यात आलेल्या या मूर्ती राम, लक्ष्मण आणि सीतेच्या आहेत. विजयनगर कालखंडातील त्यांची घडण असल्याची माहिती समोर येत आहे.
महत्वाच्या बातम्या :-

मराठा आरक्षणाबाबत पुन्हा रस्त्यावर उतरावे लागले तरी चालेल ; शिवेंद्रराजे भोसले कडाडले
.. नाहीतर मराठा तरुण नक्षलवादाच्या मार्गावर जातील ; संभाजी ब्रिगेडचा गंभीर इशारा
अध्यादेश काढा अन्यथा परिणाम भोगा ; मराठा आरक्षणावरुन उदयनराजे संतापले
उद्धव ठाकरेंनी 5 मिनिटं मराठा आरक्षणावर बोलूनच दाखवावं ; चंद्रकांत पाटलांचा जोरदार हल्ला
मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी तसूभरही मागे हटणार नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Loading...

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. दशकांच्या प्रतीक्षेनंतर भारतात परतणार राम-लक्ष्मण- सीतेच्या चोरीला गेलेल्या मूर्ती InShorts Marathi.

Loading...

पोलीस भरतीवरुन खासदार संभाजीराजे ठाकरे सरकारवर संतापले, म्हणाले “ही तर ….

Previous article

मराठा आरक्षणाच्या १३% जागा रिक्त ठेवून पोलीस भरती करावी ; विनायक मेटेंची मागणी

Next article

You may also like

Comments

Comments are closed.