मुख्य बातम्या

राज्यात सप्टेंबर अखेर शाळा सुरू होण्याची शक्यता कमी ; शिक्षणमंत्र्यांचा मोठा खुलासा

0

भारत देश सध्या कोरोनासारख्या संकटाचा सामना करत आहे. अशातच देश हळूहळून अनलॉक होण्याच्या मार्गावर आहे. त्यात कोरोनाच्या संकट काळात शाळा बंद राहिल्या. मात्र आता केंद्र सरकारनं २१ सप्टेंबरपासून ज्या संस्थांना शाळा सुरु करु शकतात, असं गाईडलाईनमध्ये म्हटलं आहे. मात्र राज्यातल्या शाळा कधी सुरू होणार याबद्दल अजूनही अनिश्चितता कायम आहे. त्यावर राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सप्टेंबर अखेर शाळा सुरू होण्याची शक्यता वर्तवली आहे.
वर्षा गायकवाड यांनी राज्यातील संस्था चालक तसंच शिक्षण तज्ज्ञ यांच्यासोबत चर्चा केली. त्यात बहुतेक शिक्षक संस्थाचालक यांनी ग्रामीण भागात कोरोना रुग्ण वाढत असल्यानं तूर्तास शाळा सुरू करण्सास हरकत घेतली आहे. यावर आता राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा केली जाणार आहे.तूर्तास इयत्ता १० आणि ९ वी तुकड्यां सुरू करण्याचा विचार नसल्याचीही माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.
शहरी भागास ग्रामीण भागात कोरोना रुग्ण वाढत असल्याने सप्टेंबर अखेर शाळा सुरू करण्याबाबत बहुतेक प्रतिकूल मत आहे, असेही गायकवाड यांनी सांगितलं.केंद्र सरकारनं 21 सप्टेंबरपासून ज्या संस्था शाळा सुरू करू शकतात, त्यांनी सुरू कराव्यात असं म्हटलंय. दरम्यान केंद्र सरकारनं ऑनलाइन आणि डिस्टन्स लर्निंगला यापुढेही परवानगी दिली आहे. इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांना शाळांमध्ये शिक्षकांकडून मार्गदर्शन घेण्यासाठी जाता येणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
महत्वाच्या बातम्या :-

‘दिल्लीत पवारांना हाणले होते ते मंत्री जितेंद्र आव्हाड विसरलेले दिसताहेत’- भाजप आमदार
कांदा निर्यातबंदीच्या निर्णयानंतर शरद पवारांनी केंद्राला खडसावले, म्हणाले ….
राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्या चिराग पासवानांवर रोहित पवार चिडले
दोषी प्रशांत भूषण यांना १ रुपया दंड, न भरल्यास ३ महिने तुरुंगवास
काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल ; गुलामनबी, खरगे यांना महासचिव पदावरून हटवले !

Loading...

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. राज्यात सप्टेंबर अखेर शाळा सुरू होण्याची शक्यता कमी ; शिक्षणमंत्र्यांचा मोठा खुलासा InShorts Marathi.

Loading...

शरद पवार सगळ्या विषयांवर बोलतात मग मराठा आरक्षणावर अजून गप्प का? नीलेश राणेंचा थेट सवाल

Previous article

कांदा उत्पादकांसाठी शरद पवार मैदानात ; मोदी सरकारला चांगलेच खडसावले !

Next article

You may also like

Comments

Comments are closed.