मुख्य बातम्या

मुख्यमंत्र्यांची स्थिती म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे ; भाजपचा मुख्यमंत्री ठाकरेंवर हल्लाबोल

0

महाराष्ट्राच्या बदनामीबद्दल मुख्यमंत्रिपदाचा मास्क बाजूला ठेवून बोलणार आहे असा सूचक इशारा देणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपनं पलटवार केला आहे.’मुख्यमंत्र्यांनी खरोखरच मुखवटा बाजूला सारण्याची गरज आहे. तरच त्यांना वस्तूस्थिती समजेल.
केवळ व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे राज्याच्या आढावा घेण्यात तुम्ही कसले समाधान मानत आहात? तुमच्या मातोश्रीबाहेर न निघण्यामुळे कित्येक अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे धैर्य खचले आहे. ठाऊक आहे का तुम्हाला? हे कधी समजणार हेच कळत नाही. त्यामुळे केवळ व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधण्यापेक्षा प्रत्यक्ष फिरलात तर तुम्हाला राज्याच्या जनतेचे खरे प्रश्न कळतील अशी टीकाही भाजपा आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली आहे.

नाचता येईना अंगण वाकडे pic.twitter.com/RBBmiYUYvE
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) September 13, 2020

मूख्यमंत्री घरात बसून काम करतात या विरोधकांच्या आरोपावर रविवारी उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे उत्तर दिले. जिथे तुम्ही जाऊ शकत नाही, तिथे मी पोहचलो, दुर्गम भागात मी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून गेलो आहे असा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला होता. त्यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या :-

उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख पडला महागात ; अब्रूनुकसानीचा कंगनाविरुद्ध अखेर गुन्हा दाखल
अनिल देशमुखांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार आहे का ?
‘कोरोना व्हायरसचा नाश झाला’, कोरोनाचा कहर वाढत असताना भाजपचा नेता बरळला
महाराष्ट्रात ठाकरे सरकारचे अत्याचार वाढलेत केंद्राने लवकर हस्तक्षेप करावा – कंगना राणौत
ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात आता कंगनाचीही चौकशी होणार ; गृहमंत्र्यांचे मुंबई पोलिसांना कडक आदेश

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. मुख्यमंत्र्यांची स्थिती म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे ; भाजपचा मुख्यमंत्री ठाकरेंवर हल्लाबोल InShorts Marathi.

राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्या चिराग पासवानांवर रोहित पवार चिडले

Previous article

कंगनाचा विषय महाराष्ट्रात कोणी सुरू केला? चंद्रकांतदादांचा मुख्यमंत्र्यांना थेट सवाल

Next article

You may also like

Comments

Comments are closed.