मुख्य बातम्या

महाविकास आघाडीने लोकशाहीचा गळा घोटला ; भाजपचा गंभीर आरोप

0

उपसभापतीपदाच्या निवडणूकीचा विषय न्यायालयात प्रलंबित असताना विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक घेऊन महाविकास आघाडी सरकारने लोकशाहीचा गळा घोटला आहे, अशा शब्दांत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रवीण दरेकर यांनी ही टीका केली. उपसभापतीपदाच्या निवडणूकीचा विषय न्यायालयात प्रलंबित असताना महाविकास आघाडी सरकारने विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक घेतली. याबद्दल प्रवीण दरेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सरकारने लोकशाहीच्या हक्काची पायमल्ली केल्याचा आरोप दरेकर यांनी केला आहे. तसेच करोना, शेतकरी आत्महत्या, कायदा सुव्यवस्था आणि मराठा आरक्षणासारखे महत्वाच्या विषयांवर चर्चा न करताच विधीमंडळाचे कामकाज केवळ रेटून नेण्याचे काम सरकार करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
आमचा विरोध असतानाही विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी प्रक्रिया रेटून नेण्याची सरकारने भूमिका घेतली. त्यानंतर आम्ही उच्च न्यायालयात यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायालयाने सरकारच्या महाभिवक्त्यांना बोलावले आणि त्यांची भूमिका समजून घेतली आणि यासंदर्भात पुढील सुनावणी गुरुवारी होणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. हेच मी सभापती आणि सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले, असं ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :-
वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे ‘या’ जिल्ह्यातील व्यापाऱ्यांकडून पुन्हा लॉकडाऊनची मागणी
कोरोना चाचणीचे दर आणखी कमी करणार ; आरोग्यमंत्र्यांची महत्वाची घोषणा
मोदींनी इतक्या वर्षात 1800 रुपयांची नोट का काढली नाही? व्हायरल काकूनंतर काकांची मागणी
शिरुरमधील धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश
इतक्या पारदर्शक बदल्या यापूर्वी कधीच झाल्या नाहीत ; शिवसेनेचा भाजपला टोला
 
inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. महाविकास आघाडीने लोकशाहीचा गळा घोटला ; भाजपचा गंभीर आरोप InShorts Marathi.

शूटिंगच्या सेटवर अजयच्या या सवयीने करिना खूप अस्वस्थ व्हायची, म्हणाली की जेव्हाही आम्ही सोबत असे तेव्हा तो असे करायचा.

Previous article

उद्धव साहेब आतातरी घराबाहेर पडा, नगरसेवक गाड्या फोडतात आता नागरिक देखील फोडतील…

Next article

You may also like

Comments

Comments are closed.