Royal Entertainmentमुख्य बातम्या

आरोग्यवर्धक ‘मोहरी’, आहारात करते औषधाच्या रुपात काम

0

पुणे – मोहरी म्हणजेच ‘राई’ आपण रोजच्या भाजीत वापरतो. ती नसेल तर भाजीत कमतरता जाणवते. तेलात मोहरी फुलटी की घराला स्वयंपाकाची चाहुल लागते. ती मोहरी आरोग्यदायी आहे. मोहरीत अनेक औषधी गुणधर्म आहेत शिवाय मोहरीच तेलही तेवढंच गुणकारी आहे. राईच्या तेलात एमयूएफए, पीयूएफ, ओमेगा ३ आणि ६, व्हिटॅमिन ई, खनिज आणि अँटी ऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात आढळून येतात.
त्याचसोबत यामध्ये अँटी मायक्रोबियल आणि अँटी इन्फ्लामेट्रीसारखे गुण असतात जे रोगप्रतिरोधक क्षमता वाढवण्यासोबत हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असतात. त्यामुळे राईचे तेल तुमच्या आहारात एका औषधा प्रमाणे काम करते.

एलर्जीपासून वाचवते – राईच्या तेलात अॅन्टी ऑक्सीड्स असतात त्यामुळे राईच्या तेलाने रोज अंगाची मसाज केल्यास फंगल इन्फेक्शन, त्वचेची आग होणे. तसेच खाज येण्याची समस्या निर्माण होणार नाही.

पचनाचे आजार दूर होतात – नियमित फोडणीत लहानसा चमचा मोहरीचा वापर केल्याने पचनक्रिया सुधारुन पोटाचे विकार दूर होतात. सर्वांना अॅसिडीटीचा त्रास असतो. म्हणून आहारात मोहरी वापरल्याने पोटाचे अनेक विकार दूर होतात. त्यामुळे पिंपल्स कमी होण्यास मदत होते. कारण पोट व्यवस्थित साफ न झाल्यास त्वचेचे आजार होण्याची शक्यता असते.

त्वचेचा रंग उजळतो – त्वचा उजळण्यासाठी आवश्यक असे अनेक गुणधर्म मोहरीच्या तेलात असतात. त्यामुळे त्वचेला कोणतेही हानी होत नाही. खोबरेल तेलात मोहरीचे तेल मिसळून चेहऱ्यावर लावल्याने रक्तप्रवाह सुधारतो आणि त्वचा उजळते. राईचे तेल शरीराला लावल्यास स्किनवर मॉइश्चरायजरचे काम करते. त्वचा कोरडी पडण्याची समस्या उद्भवत नाही. हिवाळ्याच्या दिवसांत तुमच्या टाचांना भेगा पडत असतील तर तुम्ही राईचे तेल भेगांना लावल्यास आराम मिळतो.

The post आरोग्यवर्धक ‘मोहरी’, आहारात करते औषधाच्या रुपात काम appeared first on Dainik Prabhat.

आरोग्यवर्धक ‘मोहरी’, आहारात करते औषधाच्या रुपात काम

Previous article

गवती चहा पिण्याचे आरोग्यदायी फायदे

Next article

You may also like

Comments

Comments are closed.