Royal politicsमुख्य बातम्याशेती

‘उपाशी राहण्याची सवय लावून घेतोय’; शेतकऱ्यांच्या मुलींचे उपोषण

0

पुणतांबा येथील शेतकऱ्यांच्या मुलींनी अन्नत्याग केला आहे. सरकारने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण न झाल्याने या मुली गेल्या ४-५ दिवसांपासून उपोषणाला बसल्या आहेत.

‘अन्नदाता सुखी नाही, त्यामुळे उद्या जेवण मिळणार नाही म्हणून आम्ही अन्नत्याग केलं आहे. उद्या जर हीच वेळ येणार असेल तर आजपासूनच आपण उपाशी राहण्याची सवय लावून घेतली पाहिजे’ असं सांगत या मुली आपल्या उपोषणावर ठाम आहेत.

Loading...

सरकार आमच्या आंदोलनाची दखल घेत नाही, असा आरोपही या मुलींनी केला आहे.  शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या , पिकाला हमीभाव द्या, अशी त्यांची मागणी आहे.

तसेच चार दिवसांपासून उपोषण करून या तिन्ही मुलींची तब्येत खालावली आहे. डाॅक्टरांनी या तिन्ही मुलींची तपासणी केली. तिन्ही मुलींच्या वजनात घट झाली असून शरीरातील साखर ही कमी झाली आहे. डाॅक्टरांनी या मुलींना नगरला हलवावे असा अहवाल तहसीलदारांना दिला आहे.

पुणतांब्यात किसान क्रांती संघटनेन शेतकरी संप केला होता. त्यावेळी सरकारने आश्वासन देत सहा महिन्यात मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दीड वर्षांपूर्वी दिलं. मात्र, आजही शेतकरी मागण्या मान्य झाल्या नसून किसान क्रांती संघटनेच्या वतीनं ‘पुन्हा एकदा देता की जाता असा’ नारा देत राज्यभर यात्रा सुरू करून जनआंदोलन सुरू केले आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज  पुणतांबा गावातील युवतींनी एकत्र येत सरकार विरोधात लढा सुरू केला आहे.

या आंदोलनात निखिता जाधव, शुभांगी जाधव आणि पूनम जाधव या तीन तरुणी सहभागी झाल्या आहे. गेल्या 4 दिवसांपासून त्यांचे हे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. परंतु, आज चार दिवस होवून गेले आहे. मात्र, सरकारमधील कोणीही तिकडे फिरकले नाही.

आंदोलनावर ठाम

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आंदोलक मुलींची भेट घेऊन चर्चा केली. जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चेनंतरही मुली आंदोलनावर ठाम आहे. जोवर मागण्या मान्य होत नाही तोवर अन्नत्याग आंदोलन सुरूच राहणार अशी भूमिका या मुलींनी घेतली आहे.

Loading...

ममता बॅनर्जी मोदी-शहांनाही जुमानत नाहीय्येत ; पहा काय आहे प्रकरण .

Previous article

भाजपच्या बालेकिल्ल्यात निर्धार परिवर्तन सभेला भरघोस प्रतिसाद

Next article

You may also like

Comments

Comments are closed.