मुख्य बातम्या

मुंबईतील पूर म्हणजे नेहमीचाच पावसाळा?? विरोधकांचा ठाकरे सरकारवर निशाणा

0

काल रात्रीपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील बहुतांश भाग जलमय झाला आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साठल्याने मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
दरम्यान, मुंबईत तुंबलेल्या पाण्यावरून भाजपा नेते आशिष शेलार यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा टीकेचे लक्ष्य केले आहे. मुंबईकर हो, सरकारच्या दृष्टीने मुंबईतील पूर म्हणजे नेहमीचाच पावसाळा?? शांतता राखा, बदल्या, टेंडर वाटप सुरू आहे, अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.

विदर्भ,पश्चिम महाराष्ट्र, कोकणासह अनेक भागात पावसाने उभ्या पिकांचे अतोनात नुकसान केले. या हाहाकाराकडे, उध्वस्त शेतकऱ्यांकडे ठाकरे सरकारने ना पाहिले, ना मदत. त्यामुळे मुंबईकर हो! सरकारच्या दुष्टीने मुंबईतील पूर म्हणजे नेहमीचाच पावसाळा ??शांतता राखा! बदल्या, टेंडर वाटप सुरु आहे!
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 23, 2020

मुंबईत निर्माण झालेल्या पूरस्थितीनंतर भाजपा आमदार आशिष शेलार यांनी ट्विट करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. या ट्विटमध्ये आशिष शेलार म्हणाले की, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकणासह अनेक भागांत पावसाने उभ्या पिकांचे अतोनात नुकसान केले. या हाहा:काराकडे, उद्ध्वस्त शेतकऱ्यांकडे ठाकरे सरकारने ना पाहिले, ना मदत केली. त्यामुळे मुंबईकर हो, सरकारच्या दृष्टीने मुंबईतील पूर म्हणजे नेहमीचाच पावसाळा?? शांतता राखा, बदल्या, टेंडर वाटप सुरू आहे, असा टोला आशिष शेलार यांनी लगावला.
महत्वाच्या बातम्या :-

Alert : मुसळधार पावसामुळे खरीप पिक खराब होण्याचा हवामान खात्याकडून इशारा !
छत्रपतींच्या महाराष्ट्रात ठाकरे सरकार ‘एवढं’ करू शकत नाही ; भाजपकडून राज्यसरकारचा तिव्र निषेध
बाप रे ! गेल्या २४ तासांत कोरोनाचे ९६,४२४ रुग्ण वाढले !!
मुंबईला मुसळधार पावसाने झोडपले ; ‘या’ भागात ऑरेंज अलर्ट
शिवसेना दाऊदला घाबरते ; रामदास आठवलेंचा खळबळजनक आरोप !

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. मुंबईतील पूर म्हणजे नेहमीचाच पावसाळा?? विरोधकांचा ठाकरे सरकारवर निशाणा InShorts Marathi.

धुवांधार पावसावरुन ‘केम छो वरळी’ म्हणत मनसेचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल

Previous article

Corona Update : राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची बाधा

Next article

You may also like

Comments

Comments are closed.