मुख्य बातम्या

मरिन ड्राईव्हच्या किनाऱ्याला तुमच्या ढोंगीपणाचा गाळ दिसला ; ठाकरे सरकारच्या कारभारावरून भाजपाची टीका

0

भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ट्विटरवरून जोरदार टीका केली आहे. ‘आम्ही पर्यावरण पुरक दिवे लावले ते पाप?, झाला ना तुमचा दुटप्पीपणा, मुंबईचे बेगडी प्रेम उघड?, आता क्विन नेकलेसची माळ हे तोडूच टाकत आहेत, क्विन नेकलेसच राहणार नाही त्याचे काय? असं म्हणत आशिष शेलार यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. ट्विटरवरून त्यांनी हल्लाबोल केला आहे.

केंद्र सरकारच्या पुढाकाराने पर्यावरण पुरक एलईडी दिवे मुंबईत लावले गेले तेव्हा काही जणांनी मरिन ड्राईव्ह, क्विन नेकलेसची शोभा जाईल म्हणून केवढा थयथयाट केला.अखेर झाले काय? तर शोभा वाढलीच!पण..आता क्विन नेकलेसची माळ हे तोडूच टाकत आहेत, क्विन नेकलेसच राहणार नाही त्याचे काय?1/2
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 19, 2020

आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचे ट्विट केलं आहे. “केंद्र सरकारच्या पुढाकाराने पर्यावरण पुरक एलईडी दिवे मुंबईत लावले गेले तेव्हा काही जणांनी मरिन ड्राईव्ह, क्विन नेकलेसची शोभा जाईल म्हणून केवढा थयथयाट केला. अखेर झाले काय? तर शोभा वाढलीच! पण.. आता क्विन नेकलेसची माळ हे तोडूच टाकत आहेत, क्विन नेकलेसच राहणार नाही त्याचे काय?” असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

आता पारसी गेट तोडलाच…समुद्रात अधिकचा भराव टाकून ती जागा पण खाणार…परिसराची शोभा घालवणार.आता हे तुम्ही करताय ते पुण्य? आम्ही पर्यावरण पुरक दिवे लावले ते पाप?झाला ना तुमचा दुटप्पीपणा, मुंबईचे बेगडी प्रेम उघड?मरिन ड्राईव्हच्या किनाऱ्याला तुमच्या “ढोंगीपणाचा गाळ” दिसला ना!2/2
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 19, 2020

“आता पारसी गेट तोडलाच…समुद्रात अधिकचा भराव टाकून ती जागा पण खाणार…परिसराची शोभा घालवणार. आता हे तुम्ही करताय ते पुण्य?, आम्ही पर्यावरण पुरक दिवे लावले ते पाप?, झाला ना तुमचा दुटप्पीपणा, मुंबईचे बेगडी प्रेम उघड?, मरिन ड्राईव्हच्या किनाऱ्याला तुमच्या “ढोंगीपणाचा गाळ” दिसला ना!” असं ट्विट शेलार यांनी केलं आहे. याआधीही काही दिवसांपूर्वी आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला होता.
महत्वाच्या बातम्या :-

मोदी सरकारचा मोठा निर्णय ; खासदारांच्या पगारात होणार ३० टक्के कपात !
अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांसाठी पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय ! लोकलच्या १५० फेऱ्या वाढवल्या !!
पुण्यात मास्क न घालणाऱ्यांकडून वसूल केला तब्बल 25 लाख रुपयांचा दंड

मुंबईत येत्या काही आठवड्यांमध्ये भयंकर पसरेल कोरोना !
दारुप्रमाणे मंदिरातून महसूल मिळाला असता तर मंदिरं उघडली असती ; भाजपचा आरोप

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. मरिन ड्राईव्हच्या किनाऱ्याला तुमच्या ढोंगीपणाचा गाळ दिसला ; ठाकरे सरकारच्या कारभारावरून भाजपाची टीका InShorts Marathi.

“बाप मुख्यमंत्री आणि स्वतः कॅबिनेट मंत्री असूनसुद्धा कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात चालले आहेत”

Previous article

Alert : मुसळधार पावसामुळे खरीप पिक खराब होण्याचा हवामान खात्याकडून इशारा !

Next article

You may also like

Comments

Comments are closed.