Royal Entertainmentमुख्य बातम्या

टिक-टॉक खरेदी करण्यासाठी स्पर्धा वाढली

0

वॉशिंग्टन -टिक- टॉक खरेदी करण्यासाठी अमेरिकेतील बलाढ्य कंपन्यांमध्ये स्पर्धा वाढली आहे. अगोदरच मायक्रोसॉफ्ट, वॉल मार्ट, गुगल, ओरॅकल, ट्‌विटर या अमेरिकेतील कंपन्यांनी टिक- टॉक कंपनी खरेदी करण्यासाठी चर्चा सुरू केली असल्याचे बोलले जाते.
वॉल-मार्ट रिटेल क्षेत्रात आहे. या कंपनीचा माहिती-तंत्रज्ञान कंपनीशी फारसा संबंध नसतानाही वॉल-मार्ट या स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. आता सेंट्रीक्‍स व ट्रीलर या दोन कंपन्यांनी टिक- टॉकचे अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या देशातील कामकाज ताब्यात घेण्यासाठी 20 अब्ज डॉलर उपलब्ध करण्याची तयारी दर्शविली आहे. माध्यमातील या बातम्यावर शिक्कामोर्तब करण्यास टिक – टॉकची पालक कंपनी असलेल्या बाईट डान्सने नकार दिला आहे.
The post टिक-टॉक खरेदी करण्यासाठी स्पर्धा वाढली appeared first on Dainik Prabhat.

ट्विटरचा मोठा निर्णय, ट्विट ‘कॉपी-पेस्ट’ करणाऱ्यांवर बसणार लगाम!

Previous article

जगातला सर्वात स्वस्त 5G फोन लाँच, जाणून घ्या शानदार फीचर्स

Next article

You may also like

Comments

Comments are closed.