Royal politicsटॉप पोस्ट

मंदिरांवर चर्चा करून रोजगार निर्माण होणार नाही:- सॅम पित्रोदा

0

‘मी जेव्हा कधी आपल्या देशात देव, मंदिर, धर्म, जात यांच्यासंबंधी होणारे वादविवाद पाहतो  तेव्हा मला भारताची चिंता वाटते.’ हे वक्तव्य कोण्या राजकीय नेत्याचे नाही तर भारतातील मोबाईल क्रांतीचे जनक असलेल्या सॅम पित्रोदा यांचे आहे. आज देश निवडणुकांच्या आणि पक्षांच्या हिशोबणे धर्म, जात या आधारावर वाटला जात असताना सॅम पित्रोदा यांचे हे विधान भारतीयांच्या डोळ्यात सत्य परिस्थितीचे अंजन घालणारे आहे.

‘धर्मामुळे उद्या कोणतीही रोजगार निर्माण होणार नाहीये, फक्त विज्ञानच भविष्याची निर्मिती करु शकते.’ देशात उभारण्यात येणार्‍या मंदिरांच्या परिस्थिती बद्दल ते गांधीनगर येथील एका विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बोलत होते. सार्वजनिक ठिकाणी विज्ञानावर फार कमी चर्चा केली जाते अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त करून दाखवली. 

 


रोजगारासंबंधी चर्चा  करताना त्याला कसे राजकीय रूप दिले जाते या बद्दल बोलताना ते म्हणाले की, ‘जेव्हा कधी रोजगारासंबंधी चर्चा होते, तेव्हा त्याला नेहमी एक राजकीय बाजू दिलेली असते’.  ‘देशातील तरुणांना लोकांकडून आणि खासकरुन राजकारण्यांकडून भरकटवलं जात आहे. अनावश्यक गोष्टी सांगून त्यांना चुकीच्या मार्गावर ढकलले जात आहे.’ असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. 


Loading...

‘आपल्या देशात अनावश्यक गोष्टींवर प्रमाणाबाहेर चर्चा केली जाते, ज्याची मला अत्यंत काळजी वाटते. आपण काहीही महत्व नसलेल्या गोष्टींवर चर्चा करतो, तरुणांना चुकीचं मार्गदर्शन देतो, त्यांना चुकीच्या मार्गावर नेतो, त्यांना आपण तथ्य सांगत नाही, त्यांच्याशी खोटं बोलतो’, असं ते म्हणाले.

अनेक नेते अर्थ नसताना बोलतात- 

‘अनेक नेते अशा गोष्टी बोलत असतात ज्यांना काही अर्थ नसतो. कारण ते दुर्लक्षित असतात. आपल्या संपूर्ण आयुष्यात भाषण देण्याशिवाय त्यांनी काहीच केलेले नसते. तरुणांना मार्गदर्शन देण्यासाठी ते योग्य नाहीत’,  त्यांनी विद्यार्थ्यांना आपले पालक, शिक्षक आणि राजकारण्यांपेक्षा वेगळ्या दृष्टीने विचार करा असे सांगत मोलाचा सल्ला दिला.

देशातील धर्माचा वापर करून कारण नसताना, फक्त  आपला स्वार्थ साधण्यासाठी राजकारणी नेते मंडळी अत्यंत खालच्या दर्जाची वक्तव्य करताना आपण रोज ऐकतो, वाचतो. समाजाला चांगले विचार देऊन पुढे नेण्यापेक्षा समाजाचा आपल्या स्वार्थसाठी आणि सत्ता मिळवण्यासाठी वापर करून घेणार्‍या या नेत्यांपासून सामान्याने लांब राहिलेलेच बरे असा सामान्य माणसाला वाटण्याची वेळ आता आहे.

Loading...

राज्यातील दूध उत्पादक शेतकरी आक्रमक, दुधाच्या दरात वाढ करण्याची मागणी

Previous article

Sacred Games:- संवादासाठी कलाकार जबाबदार नाहीत- उच्च न्यायालय; कॉंग्रेसकडून याचिका मागे

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *