Royal politicsटॉप पोस्ट

तेलंगणा दिवसानिम्मित पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांच्या शुभेच्छा

0

तेलंगणा दिवसानिम्मित पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी लोकांना शुभेच्छा दिल्या आहेत. २०१४ साली आंध्रप्रदेशपासून वेगळे होत स्वातंत्र्य राज्याचा  दर्जा मिळवणारे हे २९ वे राज्य ठरले. के.चंद्रशेखर राव यांना सत्तेत येऊन चार वर्ष  पूर्ण झाली आहे. राज्याने गेल्या चार वर्षात चांगली प्रगती केली आहे. या निमित्ताने हा दिवस उत्साहाने आणि आनंदाने साजरा करण्यात येईल असे राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी या वेळी संगितले.

तेलंगणा दिवसानिम्मित विविध योजना

Loading...

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय तेलंगणा समिती  या राज्यातील सत्तेत असलेल्या पक्ष्यांकडून तेलंगणा दिवसानिमित्त राज्यात  विविध योजना जाहीर केल्या जातील असे संगितले आहे. या वेळी ५० हजार नोकर्‍या निर्माण करण्याची घोषणा मुख्यमंत्रांकडून करण्यात येईल असे राष्ट्रीय तेलंगणा समितीकडून सांगण्यात आले आहे. २०१४ मध्ये राज्य सरकारकडून १ लाख रोजगार निर्माण करण्यात येईल असेल आश्वासन देण्यात आले होते.

वीज, शेती, सिंचन आणि स्वच्छ पिण्याचे पाणी या मूलभूत गरजा पुरवणे हे सरकारचे मुख्य काम असले तरी राज्यात पुढील वर्षी (२०१९) निवडणुका असल्याने रोजगार आणि इतर योजनावर लक्ष केंद्रीत केले जाईल असे आवाहलात सांगण्यात आले आहे. दृष्टी संबंधित समस्यांची चाचणी व मोफत शस्त्रक्रियेसाठी त्याची शिफारस केली जाईल आणि मोफत चष्म्याचे वाटप अशी योजना जाहीर केली जाईल असे मुख्यमंत्री के चंद्र शेखर राव यांनी संगितले.

तसेच या निमित्ताने मुख्यमंत्र्यांकडून ५ लाखाची विमा योजना जाहीर केली जाईल अशी शक्यता होती  परंतु ही योजना १५ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.

 पॅरामोटरिंग  फेस्टिवलचे आयोजन

“आम्ही राज्यात पॅरामोटरिंग फेस्टिवलचे आयोजन करणार असून ते हैदराबादमध्ये होईल, अशा प्रकारचे राज्यातील हे पहिलेच आयोजन असेल असे  पर्यटन सचिव बी. वेंकटेशम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. यामध्ये जागतिक पॅरामोटरिंग चॅम्पियनमध्ये भारताचे प्रतिनिधित्व  करणारे १० वैमानिक सहभागी होणार आहेत. पर्यटनाच्या विभागाकडून २५०० रुपयांमध्ये फ्लॉवर शो आणि अन्य इव्हेंटचे आयोजन करण्यात आले आहे.

तेलंगणा दिवसानिम्मित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून तेलंगणावासियांना  ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या.

Loading...

विरोधी पक्ष सक्षम नाही हेच भाजपचे यश

Previous article

न्यूक्लियर क्षमता असलेल्या अग्नि -5 चे यशस्वी परीक्षण 

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *