Royal Entertainmentमुख्य बातम्या

या नवरात्रात तेजस्विनी कोणाचं रुप साकारणार?, पहा पुर्वीचे फोटो…

0

मुंबई- अभिनेत्री तेजस्वीनी पंडीत दरवर्षी नवरात्रीच्या दिवसात वेगवेळ्या देवींचे रुप साकारते. मोठ्या उत्साहाने ती या सर्व रुपाबाबत बोलत असते. त्यासंदर्भातील माहिती देत असते. 2018 पासून ती हे सगळे रुप साकारते. यावर्षी ती कोरोना योद्धांच्या रुपात वगेरे दिसेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
ऑगस्ट महिन्यामध्ये सांगली, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यात आलेल्या अभूतपूर्व पुरामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले होते. काहीजणांना आपला जीवही गमवावा लागला. त्याला अनुसरूनच तेजस्विनीने फोटोला कॅप्शन दिलं आहे.

 

View this post on Instagram

 
प्रतिपदा “कोल्हापूरची अंबाबाई ” . . याच उघड्या डोळ्यांनी विनाशाचं तांडव पाहत होते मी…माझ्यासमोर जोडले जाणारे अनेक हात वाहत जाताना पाहत होते मी… पण मी अवतरणार तरी कशी ? सावरणारे माझे हात टप्या टप्प्याने छाटलेस तू… कधी मोठया रस्त्यांसाठी, कधी साखर कारखान्यांसाठी, तर कधी उंच इमारतींसाठी. ज्या किरणांनी माझं तेज प्रदीप्तीत व्हायचं त्याच्या मार्गातच तुझ्या स्वार्थाचे होर्डिंग्ज लावलेस. मत्स्येंद्री ने फ़ुलणारा माझा रंकाळा जलपर्णीनी जखडून टाकलास तू…म्हणून सावरू शकले नाही तुला… पण शेवटी मी आई आहे. कठोर झाले तरी साथ नाही सोडणार… मी बहरायचं नाही सोडणार मी बहरायचं नाही सोडणार . . Concept & Director : @dhairya_insta_ Photographer : @bharatpawarphotography Digital art by : @amol.hirawadekar @imvishalshinde @thenameisabhishekk Asst. Dir : @shraddha_kakade Jewellery by : @pngadgilandsons Makeup : @vinodsarode Hair : @sheetalpalsande Styled by : @stylistnakshu @saniyacool @pottering.vels Costumes By : @official_dadfashionstudio PR & Social Media By : @dreamers_pr Special Thanks: @rjadhishh #navratri #tejaswinipandit
A post shared by Tejaswwini (@tejaswini_pandit) on Sep 28, 2019 at 10:29pm PDT

 
मागील वर्षी  ऑगस्ट महिन्यामध्ये सांगली, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यात आलेल्या अभूतपूर्व पुरामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले होते. काहीजणांना आपला जीवही गमवावा लागला. त्याला अनुसरूनच तेजस्विनीने फोटोशुट केलंं होतं.
दरम्यान, सगळ्याच महिला वर्गाला दरवर्षी येणाऱ्या नवरात्री उत्सवाची मोठी उत्सुकता असते. गरबा, दांडियाची मोठी उत्सुकता असते. मात्र यवर्षी कोरोनामुळे नवरात्री उत्सव आपल्याला साधेपणाने साजरा करावा लागणार आहे. असं असलं तरी देखील यावर्षी तेजस्विनी नेमच्या कोणत्या वेशात दिसते याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
The post या नवरात्रात तेजस्विनी कोणाचं रुप साकारणार?, पहा पुर्वीचे फोटो… appeared first on Dainik Prabhat.

चित्रपटात येण्यापूर्वी या अभिनेत्रींवर लोक हसायचे, आज त्यांच्या सौंदर्याचे आणि हॉटफिगर चे लोक आहेत दिवाने

Previous article

विवेक ओबेरॉयच्या पत्नीला नोटीस

Next article

You may also like

Comments

Comments are closed.