Royal Entertainmentमुख्य बातम्या

तानुश्री- नाना प्रकरण :- त्या दिवशी सेटवर नेमकं काय घडलं? सांगितलं प्रत्यक्षदर्शी स्पॉट बॉयने…

0

अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर काही दिवसांपूर्वी गंभीर आरोप केले होते. २००८ साली ‘हॉर्न ओके प्लिज’ या चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान नाना पाटेकर यांनी माझ्याशी असभ्य वर्तन केल्याचे तनुश्रीने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते. त्यानंतर सिनेसृष्टीतून अनेक कलाकारांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली.

सेटवर नेमकं काय घडलं?

‘हॉर्न ओके प्लीज’च्या सेटवर गाण्याच्या शूटिंगचे काही टेक झाले होते. त्यानंतर नाना पाटेकर यांनी एका मुलामार्फत तनुश्रीला आपल्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये बोलावून घेतलं. आत काय घडलं ते त्या दोघांनाच माहीत. पण, काही वेळातच तनुश्री तावातावानं बाहेर आली. गणेश आचार्य आणि चित्रपटाच्या काही मोठ्या लोकांशी इंग्लिशमधून भांडू लागली. सुरुवातीला सगळ्यांना काय चाललंय तेच कळत नव्हतं. नानानं काहीतरी केलंय, असा तिचा रोख स्पष्ट दिसत होता.

Loading...

सगळे जण तिची समजूत घालत होते. नाना मोठा माणूस आहे. तुझे करिअर बरबाद होईल असेच सगळे तिला सांगत होते. पण तनुश्री ऐकायला तयार नव्हती. ती आपली बाजू तावाने मांडत होती. तिच्यावर अन्याय झाल्याचे दिसून येत होते. काही वेळातच ती तेथून निघून गेली. थोड्या वेळाने नाना पाटेकर बाहेर आले आणि जणू काही घडलेच नाही असे ते वावरू लागले. पण इतर सारेच नानांकडे संशयाने बघत होते.

अशा प्रकारचा धक्कादायक प्रकार घडला असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी रामदास बोर्डे यांनी दैनिक लोकमत या वृत्तपत्राशी बोलतांना दिली. रामदास बोर्डे हे ‘हॉर्न ओके प्लिज’ च्या सेटवर स्पॉट बॉय म्हणून काम करत होते.रोजगाराची चिंता असल्यामुळे त्या वेळेला बोलु शकलो नाही मात्र आता मी सर्व प्रकार न्यायालयात बोलण्यासाठीही तयार असल्याचं रामदास बोर्डे यांनी सांगितले.

सध्या तनुश्रीने केलेल्या तक्रारी नंतर ओशिवारा पोलिसांनी नाना पाटेकर आणि इतर तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये हॉर्न ओके प्लिज या चित्रपटाचे नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य ,चित्रपटाचे निर्माते सामी सिद्धीकी, चित्रपट दिगदर्शक राकेश सारंग यांचा समावेश आहे.


हे ही वाचा- 

IND Vs WI:- दूसरा दिवस भारताचा, तिघांची अर्धशतके; उमेश यादवचे सहा बळी

#MeToo :- लैंगिक शोषणाच्या आरोपांची तपासणी करण्यासाठी समितीची नेमणूक करणार- मेनका गांधी

भाजपने कितीही चेटूकगिरी केली तरीही राफेलचे भूत इतक्यात खतम होईल असे वाटत नाही : सामना


 

Loading...

धनगर आरक्षणाचा प्रश्न चिघळणार,‘टिस’चा अहवाल धनगर समाज विरोधात

Previous article

‘अमिताभचं सत्यही लवकरच बाहेर येईल’

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *