Royal EntertainmentRoyal politicsट्रेंडिंगभारतमहाराष्ट्रमुख्य बातम्या

राज ठाकरे गुंड, बाळासाहेबांची खुर्ची न मिळाल्याने ते तोडफोड करतात : तनुश्री दत्ता

0

टीम महाराष्ट्र देशा- अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर अनेक गंभीर आरोप करणारी अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष यांच्यावर तोफ डागली आहे. राज ठाकरेंना बाळासाहेब ठाकरेंची खुर्ची हवी होती ती मिळाली नाही म्हणून ते तोडफोड करतात. नालायक माणूस जेव्हा स्वतःला लायक ठरवण्यासाठी प्रयत्न करतो तेव्हा तो तोडफोडच करतो असा खळबळजनक आरोप मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत तनुश्री दत्ताने केला आहे.

दरम्यान, यापूर्वी बॉलिवूडपासून दूर गेलेली अभिनेत्री तनुश्री दत्ताने आपल्यासोबत गैरवर्तन झाल्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली होती. ‘होर्न ओके प्लीज’ चित्रपटाच्या सेटवर अभिनेते नाना पाटेकर यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप तनुश्रीने केला आहे. तसेच मनसेच्या कार्यकर्त्यांकडून त्यांनी मला आणि माझ्या परिवाराला जीवे मारण्याची धमकी दिली असा सनसनाटी आरोप तनुश्रीने केला आहे.

Loading...

तनुश्री दत्ता हिच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे –

  • राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी म्हणजेच मनसे कार्यकर्त्यांनी माझी कार फोडली .
  • नाना पाटेकरांनी मला मनसैनिकांना हाताशी धरून धमकावण्याचा प्रयत्न केला .
  • मनसेची भाषा कायम तोडफोडीची आहे. राज ठाकरेंना बाळासाहेब ठाकरेंची खुर्ची हवी होती. ती मिळाली नाही, त्यामुळे ते चिडले आहेत त्यांना ‘सरकार राज’ आणायचे आहे स्वतःला सिद्ध करायचे आहे.
  • नाना पाटेकर हा चिंधी अभिनेता आहे त्याने आणि राज ठाकरेंनी एकत्र येत मला छळलं .
  • राज ठाकरे गुंड आहे, त्याने आपल्यासारखेच गुंड पक्षात घेतले आहेत त्यांना तो तोडफोड करण्यासाठी ठिकठिकाणी पाठवत असतो
  • नेता तो असतो जो कमकुवत, कमजोर माणसाना संरक्षण देतो. महिलांवर हल्ला करणारा नेता असतो.
  • नाना पाटेकर कॅरेक्टर आर्टिस्टच राहिला त्याला कोणतीही अभिनेत्री कोणतीही मुलगी भाव देत नाही. त्यामुळे तो मुलींसोबत गैरवर्तन करतो.
Loading...

करिना कपूरला सैफसोबत नव्हे तर राहुल गांधींसोबत जायचं होत ‘डेट’ वर

Previous article

निवडणूक आयोगाकडे शिवसेनेने केली थेट भाजपाची नोंदणी रद्द करण्याची मागणी

Next article

You may also like

Comments

Comments are closed.