टॉप पोस्टराजकारण

मद्रास उच्च न्यायालयाचे तमिळनाडूतील आमदारांच्या अपात्रतेबाबत एकमत नाही

0

मद्रास:-

18  आण्णा द्रमुकच्या आमदारांच्या अपात्रतेबाबतच्या पक्षांतर बंदी प्रकरणाबाबत मद्रास उच्च न्यायालयाने  दोन वेगवेगळे निर्णय दिले आहेत. न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांनी सभापती पी. धनपाल यांचा निर्णय योग्य ठरवत आमदारांना अपात्र ठरवण्याचा निर्णय दिला परंतू न्यायमूर्ती सुंदर यांनी या निर्णयाला असहमती दिली.

Loading...

दोन न्यायमूर्तींचे एक मत न झाल्याने आता या प्रकरणी निकाल देण्यासाठी तिसर्‍या न्यायमूर्ती ची नेमणूक न्यायमूर्ती हुलवडी जी. रमेश  यांच्याद्वारे केली जेईल. नेमण्यात आलेल्या  तिसर्‍या  न्यायमूर्तीकडून कोणताही निर्णय येत नाही तो पर्यंत पुनर्निवडणूक किंवा पोटनिवडणूक घेतली जाणार नाही.

का ठरलेत हे आमदार अपात्र- 

मागीलवर्षी एआयएडीएमके च्या पलानीस्वामी सरकार ला समर्थन देणार्‍या टी. टी . दिनाकरण गटाच्या 18 आमदारांनी समर्थन मागे घेतले होते. त्यांनी स्वइच्छेने पक्षाची सदस्यता सोडून दिली होती. या कारणाने त्यांना अपात्र ठरवण्यात आले.

मागील वर्षी 22 ऑगस्ट ला या 18 आमदारांनी राज्यपाल सी विद्यासागर राव यांची भेट घेतली होती, त्यांचं म्हणणं होत की त्यांनी पालानीस्वामी यांच्या सरकार मध्ये त्यांचा विश्वास गमावला आहे.

यानंतर एआयएडीएमके चे व्हीप प्रमुख एस राजेंद्रन यांनी विधानसभेत तक्रार केली  की, हे आमदार विरोधी पक्षाच्या कारभारात सहभागी होत आहेत.

18 सप्टेंबर 2017 ला सभापती  पी. धनपाल यांनी या 18 आमदारांना सत्तेचा गैरवापर केल्या प्रकरणी 10 परिशिष्टांतर्गत (पक्षांतर बंदी कायदा) अपात्र ठरवले होते. आणि तमिळनाडू विधानसभा (पक्षांतर बंदी कायद्या द्वारे अपात्र) नियम 1986 आणि राजपत्रित अधिसूचने अंतर्गत जाहीर केले की पक्षांतर बंदी कायद्या नुसार ही पदे रिक्त झाली आहेत.

सभापतींनी दिलेल्या या निर्णयाबद्दल या आमदारांनी  उच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतू 20 सप्टेंबर ला दिलेल्या निर्णयानुसार उच्चन्यायालयाने पोटनिवडणुकीला स्थगिती दिली परंतू त्या आमदारांना अपात्र ठरवण्यास नकार दिला होता.

थांगटामझेचेलवन (अनदीपट्टी ), आर मुरुगन (अरूर), मरायप्पन केनेडी (मनामदुराई), काथईरगमू (पेरियाकुलम), सी जयंती पद्मनाभन (गुडीयाथम), पी. पाझीनियप्पन (पापारीडियापट्टी), व्ही सेंथिल बालाजी (अरावकुचिई), डॉ एस मुथय्या आर. बालासुब्रमणी (अंबूर), एदरकोट्टाई एसजी सुब्रह्मण्यम (अमरावती), पी. व्हीट्रीवल (पारामबोर), एन.जी पार्थिबन (शोलिंगर), एम कोथंदापनी (तिरुपूरोर), टीए एझुमलई (पूनमळे), एम रंगास्वामी (थांजावुर), आर थांगदुराई सथुर), आर कंदराज (ओटापीदाराम) आणि के उमा माहेश्वरी (विलाथिकुलम) हे अपात्र ठरलेल्या आमदारांपैकी आहे.

आजच्या निकालावरुन हे स्पष्ट होते की, नेमण्यात आलेले तिसरे न्यायमूर्ती या प्रकरणाचा  अभ्यास करतील आणि त्या नंतर आपला निर्णय देतील. न्यायालयाचा निकाल येई पर्यंत 2 महिने लागू शकतात.  परंतू तो पर्यंत कोणतीही पोटनिवडणूक घेतली जाऊ शकत नाही असे उच्च न्यायालयाकडून सांगण्यात आले.

Loading...

IND vs AFG : धवन – विजयचे शानदार शतक, पहिला दिवस बरोबरीत

Previous article

FIFA WC 2018 : यजमान रशियाची धमाकेदार सुरूवात, सौदी अरेबियावर केली 5-0 ने मात

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *