Royal Entertainmentमुख्य बातम्या

कोरोनामध्ये घराबाहेर फिरताना ‘ही’ काळजी घ्या, अन्यथा नंतर होईल पश्चाताप

0

पुणे: कोरोना विषाणूमुळे जगभरात दहशत पसरली आहे. भारतातही संक्रमित लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आता सुद्धा काही नागरिक आपल्या घरामध्ये कैदआहेत. या धोकादायक साथीची लागण टाळण्यासाठी डॉक्टरांकडून वेळोवेळी गाइडलाईन्स जारी केल्या जातात.
दरम्यान, आता मोठ्या प्रमाणात लॉकडाऊन शिथिल करण्यात आला असून अनेकांनी ऑफिसमध्ये जाऊन काम करण्यास सुरुवात केली आहे. बाहेर फिरताना देखील आपण विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. घर ते ऑफिस असा प्रवास करताना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी काही महत्वाच्या टिप्स आज तुम्हाला सांगणार आहोत…
सर्व प्रथम तुम्ही घरातून बाहेर पडण्यापूर्वी मास्क लावा. सार्वजनिक ‍ठिकाणी मास्क लावणे आवश्यक आहे ज्याने आपण सुरक्षित राहाल. तसेच एकट्यात मास्क वापरु नये. याचा वापर आपल्या गर्दी असलेल्या ठिकाणांवर करायचा आहे.
शक्यतो वर चढण्यासाठी पायर्‍यांचा वापर करा परंतू असे करणे शक्य नसेल तर लिफ्ट वापरताना किंवा लिफ्टचं दार उघडताना बोटांचा वापर टाळा. याऐवजी हाताचे कोपर वापरा. टिशू जवळ असणे अधिकच योग्य.
अतिशय महत्पूर्ण गोष्ट म्हणजे, बशिंकताना किंवा खोकताना आपले तोंड टिशूने किंवा रुमालाने कव्हर करा. नंतर लगेच ते टिशू डस्टबिनमध्ये टाकून द्या.
आपले हात सतत स्वच्छ करत राहा. यासाठी तुम्ही साबण, हॅन्डवॉश किंवा सॅनिटायजर वापरु शकता.
सोशल डिस्टेंसिंगचा नियम दुर्लक्ष करु नका. लोकांपासून लांब उभे राहून व्यवहार करा.
वारंवार आपल्या चेहर्‍यावर हात फिरवणे टाळा. ही सवय सोडल्यास कोरोनापासून बचावाची शक्यता कितीतरी पट वाढेल.
 
The post कोरोनामध्ये घराबाहेर फिरताना ‘ही’ काळजी घ्या, अन्यथा नंतर होईल पश्चाताप appeared first on Dainik Prabhat.

अनेक आजारांवर रामबाण उपाय ‘पपई रस’

Previous article

आरोग्यवर्धक ‘मोहरी’, आहारात करते औषधाच्या रुपात काम

Next article

You may also like

Comments

Comments are closed.