Royal Entertainmentमुख्य बातम्या

आणि ती प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आज ही अजय देवगणसाठी आहे अविवाहित, जाणून घ्या त्या अभिनेत्री बद्दल

0

बॉलीवूडमध्ये अजय देवगण याचे नाव येताच शांत, गंभीर आणि उत्कृष्ट अभिनेत्याची प्रतिमा आपल्या मनात निर्माण होते. त्याला इंडस्ट्रीमध्ये २६ वर्षे झाली आहेत. तो लहानपणी जितका चांगला कलाकार होता तितकाच तो आज देखील आहे.
अजय देवगणने असे नाव कमावले आहे की त्याची फॅन फॉलोईंग भारतात तसेच जगभरातील देशांमध्ये आहे. आज जगभरात त्याचे लाखो चाहते आहेत. बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत ज्यांनी बाल कलाकार म्हणून करिअर सुरू केले आहे. अजय देवगन हा देखील त्यापैकी एक आहे.
आपल्या बालपणात त्याने आपल्या अभिनयाने सर्वांना चकित केले. त्याचा बालपणीचा अभिनय पाहून प्रेक्षकांना कळून चुकले होते की मोठा झाल्यावर हा बॉलिवूडमध्ये बरेच नाव कमावणार. पण तुमच्या माहितीसाठी की अजय देवगनपेक्षा देखील अधिक प्रसिद्ध त्याच्या प्रेमकहाण्या आहेत. आपल्या फिल्मी करियरमध्ये अजयचे नाव बॉलिवूडच्या अनेक नामांकित अभिनेत्रींशी संबंधित होते.
अजयशी संबंधित सर्व अभिनेत्रींचे लग्न झाले असतानाच अजयमुळे एक अशी देखील अभिनेत्री आहे तिने अजय साठी अजून लग्न केलं नाही.ही छोटी अभिनेत्री नसून बॉलिवूडची एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.त्या अभिनेत्रीबद्दल जाणून घेण्यापूर्वी आपण अजय देवगणच्या काही गाजलेले किस्से जाणून घेऊया.
अजय देवगन बॉलीवूडची मस्त-मस्त गर्ल रवीना टंडन हिच्या प्रेमात पडला होता. त्या दिवसांत अजयची रवीनासोबतची जोडी चांगलीच गाजली होती. त्या काळात ते एकमेकांच्या प्रेमात पडले परंतु ते कधीही एक होऊ शकले नाहीत. रवीनाशिवाय अजून काही हिरोईन सोबत आजचे नाव दिसून आले होते.
रवीना नंतर त्याचे नाव करिश्मा कपूरशी संबंधित होते.असं म्हणतात की करिश्मामुळे अजय आणि रवीनाचा ब्रेकअप झाला होता. इतकेच नाही तर करिश्मामुळे मला बऱ्याच चित्रपटांतून काढून टाकण्यात आल्याचा आरोप रवीनाने केला होता.करिश्माला हे आवडले नाही आणि कारिश्माने अजय आणि रवीना या दोघांपासून देखील लांब झाली.
यानंतर त्याचे नाव बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री तब्बूशी जोडले गेले होते आणि रिपोर्ट्सनुसार तब्बू अजय देवगणवर अजूनही खूप प्रेम करते. वास्तविक, तब्बू आणि अजय यांनी ९० च्या दशकात एकत्र अनेक चित्रपट केले. यावेळी दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. तब्बूने अजयवर मनापासून खूप प्रेम करायला सुरुवात केली. पण कदाचित अजयचं हे प्रेम खरं नव्हतं, त्यामुळेच तर काजोल त्याच्या आयुष्यात आली.

अजयने काजोलबरोबर देखील बर्‍याच सिनेमामध्ये काम केले होते आणि त्याचा कल काजोलकडे जात होता. हळू हळू दोघे एकमेकांच्या इतक्या प्रेमात पडले की त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि तब्बू तशीच अविवाहित राहिली. सूत्रांच्या माहितीनुसार अजय देवगनमुळे तब्बूने आजपर्यंत लग्न केले नाही.
The post आणि ती प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आज ही अजय देवगणसाठी आहे अविवाहित, जाणून घ्या त्या अभिनेत्री बद्दल appeared first on Marathi Entertainment.

विवेक ओबेरॉयच्या पत्नीला नोटीस

Previous article

लवकरच संपूर्ण जग को’रो’ना मुक्त होण्याचे शुभ संकेत, हा फोटो होतोय प्रचंड वायरल, जाणून घ्या त्यामागचे सत्य…

Next article

You may also like

Comments

Comments are closed.