खेळटॉप पोस्ट

FIFA WC 2018 : 12 वर्षांनी केलेल्या गोलने स्वीडनने केली साउथ कोरियावर मात

0

21 व्या फिफा वर्ल्ड कपमध्ये एफ ग्रुपमधील आजच्या मॅचमध्ये स्वीडनने साउथ कोरियाचा 1-0 असा पराभव केला. स्वीडनतर्फे 12 वर्षांनंतर वर्ल्ड कपमध्ये हा गोल करण्यात आला आहे. याआधी 2006 ला इंग्लंडविरूध्दच्या मॅचमध्ये हेनरिक लेरसाॅनने स्वीडनकडून गोल केला होता. मागील दोन वर्ल्ड कप खेळू न शकलेल्या स्वीडनची या वर्षीची सुरूवात विजयाने झाली.

मध्यंतरापर्यंत संपुर्ण सामन्यात स्वीडनचेच वर्चस्व होते. तरीही दोन्ही संघाला एकही गोल करता आला नाही.

Loading...

मध्यंतरानंतर स्वीडनच्या कर्णधार अॅन्डरेस ग्रैंनक्विस्‍टने 65 व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. हा सामन्यातील एकमात्र गोल ठरला. स्वीडनने साउथ कोरियाला गोल करण्याची संधीच दिली नाही. व त्यांनी 1-0 ने साउथ कोरियाला पराभूत केले.

आता पर्यंत झालेल्या चार लढतीमध्ये साउथ कोरियाच्या संघाला एकदाही विजय मिळाला नाहीये. हा दोन्ही संघाचा एकमेंकाविरूध्द वर्ल्ड कपमधील पहिलाच सामना होता.

संपुर्ण सामन्यात स्वीडनचे 53 % बाॅलवर वर्चस्व होते तर साउथ कोरियाचे 47 % वर्चस्व होते.

(PHOTO INPUT :- FACEBOOK/FIFAWORLDCUP)

Loading...

या केंद्रशासित प्रदेशाने देखील केली स्वतंत्र राज्याच्या दर्जाची मागणी

Previous article

पाकिस्तानकडे आहेत भारतापेक्षा अधिक अण्वस्त्रे

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in खेळ