Royal politicsटॉप पोस्ट

महाराष्ट्र स्वच्छतेत देशात अव्वल परंतू पिंपरी-चिंचवड स्वच्छतेबाबत निष्कामी

0

एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांच्या गटात महाराष्ट्रातील तब्बल 28 शहरांनी पहिल्या शंभर क्रमांकामध्ये स्थान पटकावले आहे. हा अहवाल शनिवारी केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आला.

शहरी भागातील स्वच्छतेचे मूल्यांकन करण्यासाठी स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2018 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात महाराष्ट्राने देशातील सर्वोतम स्वच्छ दुसर्‍या क्रमांकाचे राज्य असे स्थान मिळविले आहे. यामध्ये झारखंड ने सर्वोत्तम स्वच्छ राज्य असा दर्जा मिळवत महाराष्ट्र आणि छत्तीसगडला मागे टाकले आहे. झारखंड या यादीत पहिल्या क्रमांकावर असून छत्तीसगड तिसर्‍या क्रमांकावर आहे.

Loading...

मागील महिन्यात सरकारकडून सर्वोतम राज्य आणि शहरे यांची यादी जाहीर करण्यात आली होती.परंतू संपूर्ण अहवाल या वेळी जाहीर करण्यात आला नव्हता. परंतू शनिवारी   केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी मंत्रालयाच्या अहवालाच्या आधारे ‘राष्ट्रीय स्वच्छता सर्वेक्षण’ हा अहवाल जाहीर करण्यात आला. 4 जानेवारी ते 10 मार्च या काळात देशातील 4203 शहरांचे सर्वेक्षण करण्यात आले होते.

इंदौर ने सलग दुसर्‍या वर्षी सर्वात स्वच्छ शहर म्हणून क्रमांक मिळविला आहे तर भोपाल दुसर्‍या आणि चंदिगड तिसर्‍या क्रमांकावर आहे. तर घनकचरा व्यवस्थापनात नवी मुंबई शहरांने सर्वोतम क्रमांक पटकावला आहे. तर पुणे शहर 10व्या स्थानावर आहे. गेल्यावर्षी पुणे 11 व्या स्थानावर होते. तर चिंचवड पिंपरी शहराची मोठी घसरण झाली असून ते 43 व्या क्रमांकावर आहे. गेल्यावर्षी ते 9 व्या क्रमांकावर होते.

यावर्षी घेण्यात आलेल्या सर्वेक्षणात देशातील  छावणी बोर्ड (कॅन्टोनमेंट  बोर्ड) चा  देखील समावेश करण्यात आला आहे. या यादी दिल्ली ने सर्वोच्च स्थान मिळविले आहे.

सर्वोतम स्वच्छ राज्य या मानांकनात त्रिपुरा या वेळी सर्वात खालच्या क्रमांकावर आहे. तर या आधी पांडेचेरी, नागालँड आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा क्रमांक लागतो.

हे सर्वेक्षण शहरातील 6  निकषांच्या आधारे केले जाते.  शहरांच्या  कामगिरीच्या आधारावर शहरांची गणना केली जाते.  महानगर पालिकेद्वारे                  केले जाणारे घनकचरा व्यवस्थापन आणि वाहतूक, त्यांचा पुनर्वापार आणि विल्हेवाट, स्वच्छतेसंबंधित प्रगती, नवीन उपक्रम अशा विविध निकषांनाधारे हे सर्वेक्षण केले जाते.

Loading...

Hockey Champions Trophy 2018: भारताने पाकिस्तानला 4-0 ने दिली मात

Previous article

Gold Trailer : देशभक्ती, वंदे मातरम्, ब्रिटिश राज, हाॅकी आणि बरचं काही

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *