Royal Entertainmentमुख्य बातम्या

सुशांत सिंह राजपूतच्या निधनाच्या दोन महिन्यानंतर गाण्याद्वारे दिली गेली श्रद्धांजलि, भावूक करणारे आहे गाणे

0

सुशांत सिंह राजपूतच्या निधनाला आज दोन महिने झाले आहेत आणि त्याच्या आठवणीमध्ये त्याच्या मित्रांकडून एक खास ट्रिब्यूट दिला गेला आहे. सुशांत सिंह राजपूतला श्रद्धांजलि देताना इंसाफ ये एक सवाल है हे गाणे रिलीज केले गेले आहे. ४ मिनिटाच्या या गाण्यामध्ये सुशांत संबंधित काही खास फोटो शेयर केले गेले आहेत.
हे गाणे निलोत्पल मृणाल यांनी तयार केले आहे जे सुशांतचे कौटुंबिक मित्र राहिले आहेत. या गाण्याला वरुण जैनने आपला सुंदर आवाज दिला आहे, तर आदित्य चक्रवर्तीने हे गाणे लिहिले आहे आणि या गाण्याला शुभम सुंदरमने कम्पोज केले आहे.
गाण्याच्या शेवटी निलोत्पल मृणालने एक भावूक संदेश देखील शेयर केला आहे. त्यांनी लिहिले आहे कि, सुशांत सिंह राजपूत आता आपल्यामध्ये नाही, पण तो नेहमी आमच्या हृदयामध्ये जिवंत राहील. मी त्याच्या कुटुंब, मित्र आणि चाहत्यांच्या वतीने त्याला एक छोटीशी श्रद्धांजली देत आहे. मला आशा आहे कि तुम्हाला हे गाणे पसंत येईल आणि त्याला न्याय मिळवून देण्यासाठी तुमची मदत करेल.
येथे पहा गाणे

या गाण्याबद्दल बोलताना निलोत्पल म्हणाले कि, या गाण्याद्वारे फक्त कुटुंबाकडूनच सुशांतला भावपूर्ण श्रद्धांजलि व्यक्त केली जाणार नाही तर सुशांतसाठी साठी न्याय मिळवून देण्याची गोष्ट देखील वेगळ्या अंदाजामध्ये सांगितली गेली आहे. सुशांतच्या तमाम चाहत्यांची देखील इच्छा आहे कि सुशांतला लवकरात लवकर न्याय मिळावा.
निलोत्पलने पुढे सांगितले कि, या गाण्यामध्ये सुशांतची आतापर्यंतची जर्नी, त्याचे व्यक्तिमत्व, त्याच्या लहानपणापासून आतापर्यंतचे फोटो आणि देशभरामध्ये सुशांतसाठी न्यायाची मागणी करणाऱ्या चाहत्यांचे फोटो देखील सामील केले गेले आहेत. लवकरच या गाण्याचा व्हिडिओदेखील पूर्ण होईल आणि याला कुटुंबाकडून श्रद्धांजली म्हणून सर्वांसमोर सादर केले जाईल.
The post सुशांत सिंह राजपूतच्या निधनाच्या दोन महिन्यानंतर गाण्याद्वारे दिली गेली श्रद्धांजलि, भावूक करणारे आहे गाणे appeared first on Yesमराठी.

सुशांत सिंह राजपूतची बहिण श्वेता सिंह कीर्तीने केली व्हिडिओद्वारे देशाला हि अपील, व्हिडिओमध्ये दिसल्या वेदना, पहा व्हिडिओ

Previous article

अंकिता लोखंडेसाठी सुशांतने खरेदी केला होता करोडोंचा फ्लॅट, भरत होता EMI, आता अंकिताने उघड केले सत्य

Next article

You may also like

Comments

Comments are closed.