Royal Entertainmentमुख्य बातम्या

सुशांतच्या संपत्तीवर वडिलांचा दावा, मी त्याचा वारसदार आहे, सर्व काही माझे आहे, फक्त माझा हक्क

0

सुशांत सिंह राजपूत प्रकरणामध्ये नवीन वळण आले आहे. सुप्रीम कोर्टातर्फे प्रकरणाचा तपास सीबीआईला करण्यासाठी मंजुरी मिळाल्यानंतर सुशांतचे वडील केके सिंह यांचे विधान आले आहे. वडिलांनी सुशांतच्या संपत्तीवर स्वतःचा हक्क सांगितला आहे. वडील केके सिंह यांनी एक प्रेम नोट जारी करताना म्हंटले आहे कि, मी सुशांतचा कायदेशीर वारस आहे. त्यांनी सुशांतच्या प्रत्येक एसोसिएटला देखील सेवेतून मुक्त केले आहे. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचे विधान करण्यास प्रतिबंधित देखील केले आहे.
प्रेस नोट
सुशांतच्या वडिलांतर्फे जारी केलेल्या विधानामध्ये म्हंटले गेले आहे कि, सुशांतने आपल्या आयुष्यामध्ये ज्या वकिलांना, सीए आणि प्रोफेशनलला ठेवले होते, त्यांच्या सेवा घेऊन ठेवल्या होत्या, कायदेशीर वारसाच्या नात्याने आता त्यांच्या सेवा सुशांतच्या मृत्यूनंतर समाप्त करतो. केके सिंह यांनी पुढे सांगितले कि आता माझ्या सहमतीशिवाय कोणताही वकील, सीए किंवा इतर कोणाला सुशांतच्या संपत्तीला रिप्रेजेंट करण्याचा हक्क नाही.
त्यांनी म्हंटले कि नुकतेच काही वकिल मिडियामध्ये आले होते आणि त्यांनी सुशांतद्वारे वकील ठेवल्याचा दावा केला होता. या सर्व लोकांनी स्वतः आणि सुशांत दरम्यान झालेली बातची सांगितली होती. अशा गोष्टींचा खुलासा करणे इंडियन एविडेंस अॅक्ट १८७२ च्या सेक्शन १२६ आणि बार काउंसिल ऑफ इंडिया रुल्स अंतर्गत प्रतिबंधित आहे.
आता कोणालाही अधिकार नाही
सुशांतच्या वडिलांनी पुढे लिहिले कि, माझ्या सहमती शिवाय मी हा अधिकार कोणालाही देत नाही कि त्यांनी सुशांतला रिप्रेजेंट करावे. प्रेस नोटद्वारे सुशांतच्या वडिलांनी लिहिले कि, मी हे देखील स्पष्ट करतो कि मी आणि माझ्या मुलींनी एसकेवी लॉ ऑफिसेज, कमर्शियल लॉयर वरुण सिंहला वकील म्हणून अधिकृत केले आहे. याशिवाय सिनियर वकील विकास सिंह माझ्या कुटुंबाला रिप्रेजेंट करण्यासाठी अधिकृत आहेत, कोणताही दुसरा वकील जो कुटुंबाचा दावा करत आहे, मी त्याला सहमती देत नाही.
बुधवारी आला होता निर्णयबुधवारीच सुप्रीम कोर्टाने बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणामध्ये निकाल देताना प्रकरणाचा तपास सीबीआईकडे सोपवला होता. आता या प्रकारचा तपास पोलीस नाही सीबीआई करेल. याशिवाय सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती प्रकरणाला मुंबई ट्रांसफर करण्याची अपील देखील फेटाळून लावली गेली आहे.
सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर सुशांतच्या कुटुंबाने एक थँक्स गिविंग विधान जारी केले होते. सुशांतची भाची मल्लिका सिंहने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले कि, सुशांतचे कुटुंब, मित्र हितचिंतक, मिडीया आणि जगभरातील करोडो चाहत्यांचे मनापासून आभार. सुशांतप्रती आपले प्रेम आणि मजबुतीने आमच्यासोबत उभे राहण्यासाठी आम्ही तुमचे आभारी आहोत. आम्ही विशेषत: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे आभार मानतो.
The post सुशांतच्या संपत्तीवर वडिलांचा दावा, मी त्याचा वारसदार आहे, सर्व काही माझे आहे, फक्त माझा हक्क appeared first on Yesमराठी.

अंकिता लोखंडेसाठी सुशांतने खरेदी केला होता करोडोंचा फ्लॅट, भरत होता EMI, आता अंकिताने उघड केले सत्य

Previous article

अभिनेता नाही तर शेफ बनायचे होते धनुषला, रजनीकांतच्या मुलीसोबत झाले होते प्रेम, कमी वयामध्येच कमावली अपार संपत्ती

Next article

You may also like

Comments

Comments are closed.