Royal Entertainmentमुख्य बातम्या

सुशांत राजपूत प्रकरणाला नवे वळण, सुशांतच्या वडिलांनी केली रिया वरती पोलीस केस, हे केले आहेत आरोप !

0

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत ची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती विरोधात पटना येथे तक्रार नोंदवली आहे. ही तक्रार दुसरी तिसरी कोणी नाही तर खुद्द सुशांत सिंह राजपूत च्या वडिलांनी नोंदवली आहे. सुशांतच्या वडिलांनी रियावर सुशांत चे पैसे हडपण्याचा आरोप लावला आहे. तक्रार नोंदवल्यानंतर अशी खबर आली आहे की या प्रकरणी चौकशीसाठी पटना वरून चार सदस्यांची टीम मुंबईत रवाना झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी काही जणांना अटक सुद्धा होऊ शकते. सुशांतसिंग राजपूतच्या वडिलांनी रिया सोबतच तिच्या घरातील इंद्रजीत चक्रवर्ती, संध्या चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती यांच्यावर देखील आरोप लावले आहेत. सुशांत सोबत ओळख वाढवून त्याच्या पैश्याचा गैरवापर केला असे आरोप सुशांतच्या घरच्यांनी लावले आहेत.
सुशांतसिंग राजपूतच्या वडिलांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “जेव्हा रियाने पाहिले की, सुशांत तिला स्वीकारत नाही आणि त्याचा बँक बॅलन्सही कमी होत आहे, तेव्हा रियाला वाटले की सुशांतचा आता तिला काही उपयोग होणार नाही. निवेदनात असा दावा करण्यात आला आहे की रिया चक्रवर्ती 8 जूनपर्यंत सुशांत राजपूत यांच्याकडे राहिली होती. यानंतर, ती सर्व सामान, रोकड, दागिने, लॅपटॉप, संकेतशब्द, क्रेडिट कार्ड आणि तिचा पिन क्रमांक, सुशांतची आवश्यक कागदपत्रे आणि सर्व उपचार कागदपत्रे घेऊन घराबाहेर गेली.
सुशांतच्या आ*त्म*ह*त्ये*प्रकरणी मुंबई पोलिसांकडून तपासणी केली जात आहे त्यावर सुशांतच्या परिवाराकडून नाराजी व्यक्त केली जाते. सुशांत च्या वडिलांनी पटना येथील राजीव नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. सुशांतचा परिवार सतत मुंबई पोलिसांच्या तपासावर नाराजी व्यक्त करत आहे.
तर दुसरीकडे याप्रकरणाची तपासणी सीबीआयकडे सोपवली जावे अशी मागणी सतत सगळी कडून होत आहे. बीजेपी नेता सुब्रमण्यम स्वामी, बीजेपी निशिकांत दुबे, पप्पू यादव, तेजस्वी यादव, अभिनेता शेखर सुमन या सर्वांनी सुशांत सिंह राजपूत याप्रकरणी सीबीआयकडे तपास सोपवावा अशी मागणी केली आहे.
सुब्रमण्यम स्वामी यांनी या प्रकरणी पंतप्रधान मोदी यांना पत्र सुद्धा लिहिले आहे. तर महाराष्ट्रात बीजेपीच्या काही नेत्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सध्या तपासणीची मागणी केली आहे. सुशांतसिंह राजपूतने १४ जून ला मुंबईमधील वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरी ग*ळ*फा*स लावून जगाचा निरोप घेतला होता. तो अवघा ३४ वर्षांचा होता. सुशांतच्या आ*त्म*ह*त्या प्रकरणाचा तपास चालू असून आतापर्यंत याप्रकरणी ३८ जणांची चौकशी झाली आहे.
सुशांतने त्याच्या करिअरची सुरुवात किस देश मे है मेरा दिल या मालिकेतून केली होती मात्र त्याला खरी ओळख झी टीव्हीवरील पवित्र रिश्ता या मालिकेमुळे मिळाली. त्यानंतर त्याने काय पो छे‌ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. एम एस धोनी द अनटोल्ड स्टोरी, छीछोरे, सोन चिडिया यांसारख्या काही चित्रपटांमुळे त्याने त्याच्या अभिनयाची जादू दाखवून दिली होती. दिल बेचारा हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला असून तो नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !
The post सुशांत राजपूत प्रकरणाला नवे वळण, सुशांतच्या वडिलांनी केली रिया वरती पोलीस केस, हे केले आहेत आरोप ! appeared first on BollyReport.

शूSSS शांतता राखा! आक्रमणाला वेळ आहे; शिवसेनेचा भाजपला चिमटे काढत दिला ‘हा’ सल्ला

Previous article

यात तुम्ही काय करुन दाखवले? ‘या’ नेत्याचा राज्य सरकारला सवाल

Next article

You may also like

Comments

Comments are closed.