Royal politicsटॉप पोस्टमुख्य बातम्या

भाजपने बारामतीत उमेदवार उभा करावा; जनता योग्य निर्णय करेल- सुप्रिया सुळे

0

पुणे – लोकशाहीमध्ये सगळ्यांना निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. भाजपने बारामतीतून लढावे. जनता योग्य तो निर्णय करेल, मुख्यमंत्र्यांच्या बारामती लोकसभा जिंकण्याच्या दाव्यानंतर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पुण्यात भाजपच्या वतीने आयोजित शक्ती केंद्र संमेलनात शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी निवडणुकीत बारामतीत भाजपचा उमेदवार दिला जाईल. मागच्या निवडणुकीत राज्यातून भाजपला लोकसभेच्या ४२ जागा मिळाल्या होत्या. तर यावेळी ४३ जागा मिळतील आणि ती ४३ वी जागा बारामतीची असेल, असा विश्वास व्यक्त केला होता.

Loading...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर प्रतिक्रिया देताना आज बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपने बारामतीत निवडणूक लढवण्यास सांगून जनता त्यांचा योग्य निर्णय करेल असा टोला लगावला आहे.
पुण्याच्या ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थिनींसाठी सायकल वाटप कार्यक्रमानंतर सुप्रिया सुळे पत्रकारांशी बोलत होत्या.

कृषी विषयक बातम्या वाचण्यासाठी कृषीनामा या वेबसाईटला भेट द्या

सरकारकडून बोलणाऱ्यांचा गळा दाबण्याचे काम

यावेळी अभिनेते अमोल पालेकर यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अमोल पालेकर यांना बोलू न देणे हे योग्य नाही. सध्या जो बोलतो त्याचा गळा दाबण्याचे काम सुरू आहे. मी पालेकर यांच्या मागे ठामपणे उभी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Source-  Eanadu Marathi

Loading...

विखेंच्या लोणीत पवारांची ‘साखरपेरणी’; दोन्ही नातवांच्या भेटीची राज्यात चर्चा

Previous article

बारामती जिंकण्याचा विश्वास व्यक्त केल्यावर मुख्यमंत्री बारामतीत पवारांसोबत

Next article

You may also like

Comments

Comments are closed.