Royal politicsटॉप पोस्ट

कोणत्याही व्यक्तीला कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही, मॉब लिंचिंगच्या घटना रोखण्यासाठी कायदा बनवा – सुप्रीम कोर्ट

0

मॉब लिंचिंगच्या (जमावाद्वारे करण्यात येणारी हिंसा/हत्या) घटनेवर सुप्रीम कोर्टाने चिंता व्यक्त करत म्हटले की, संसदेमध्ये या विषयी एक वेगळा कायदा बनवला पाहिजे. मुख्य न्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ म्हणाले की, लोकांद्वारे होणाऱ्या हिंसेला कठोरतेने हाताळले पाहिजे. सुप्रीम कोर्टानुसार कोणत्याही व्यक्तीला कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही.

Loading...

महात्मा गांधीचे नातू तुषार गांधी आणि सामाजिक कार्यकर्ते तहसीन पुनावाला यांच्या द्वारा दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने या गोष्टी नमूद केल्या. तहसीन पुनावाला यांनी गोरक्षेच्या नावाखाली जमावाद्वारे करण्यात येणारी हिंसा रोखण्यासाठी याचिका दाखल केली होती. तर तुषार गांधी यांनी आपल्या याचिकेत म्हटले होते की, राज्य सरकारे हे या घटनेविषयी सुप्रीम कोर्टोद्वारे जारी करण्यात आलेल्या सूचनांचे पालन करत नाहीत.

याआधी जुलै महिन्यात देखील सुप्रीम कोर्ट म्हणाले होते की, जमावाद्वारे होणारी हिंसा, मग ती गोरक्षेच्या नावाखाली असेल की अन्य कोणत्या कारणांमुळे असो, या सर्वांना थांबवण्याची जबाबदारी राज्यांची आहे. सप्टेंबर 2017 मध्ये सुप्रीम कोर्टाने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक वरिष्ठ पोलिस आधिकाऱ्याची नियुक्ती करण्यास सांगितले होते. त्यानंतर जानेवारीमध्ये कार्टोने तीन राज्यांना विचारले होते की, त्यांनी कोर्टाच्या आदेशाचे पालन का नाही केले.

या संर्दभात पुढील सुनावणी 28 आॅग्स्टला होणार आहे.

गोरक्षेच्या नावाखाली करण्यात येणाऱ्या हिंसेविषयी कोणतीही स्षष्ट गाईडलाईन्स नसल्याने पोलिस कारवाई करण्यात अडचणी येत होत्या.

Loading...

महिला आरक्षणाबाबत राहुल गांधीचे पंतप्रधानांना पत्र, पावसाळी अधिवेशनात विधेयक पास करण्याची मागणी

Previous article

राहुल गांधींबद्दल अपशब्द वापरल्या प्रकरणी बसपाच्या उपाध्यक्षाची मायावतींकडून हकालपट्टी

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *