Royal Entertainmentमुख्य बातम्या

अभिनेता नाही तर शेफ बनायचे होते धनुषला, रजनीकांतच्या मुलीसोबत झाले होते प्रेम, कमी वयामध्येच कमावली अपार संपत्ती

0

साउथ चित्रपटांमधील सुपरस्टार रजनीकांतचा जावई धनुषचा जन्म २८ जुलै १९८३ रोजी तामिळनाडूमध्ये झाला होता. त्याच्या वडिलांचे नाव कस्तुरी राजा आहे. धनुषने वडिलांच्या दिग्ददर्शनाखाली बनलेल्या चित्रपटामधून अभिनय जगतामध्ये डेब्यू केला होता. त्याच्या पहिल्या चित्रपटाचे नाव थुल्लुवाधो इलामाई होते. २००३ मध्ये रिलीज झालेल्या तिरुदा तिरुदी चित्रपटामधून त्याला ओळख मिळाली. चला तर धनुषबद्दल आपण काही रंजक माहिती जाणून घेऊया.
बॉलीवूडमध्ये सफलताधनुष साउथ चित्रपटांमध्ये लोकप्रिय आहेच त्याचबरोबर त्याला बॉलीवूड चित्रपटांमध्ये देखील सफलता मिळाली आहे. रांझणा चित्रपटामध्ये कुंदनची भूमिका साकारून त्याने लाखो चाहत्यांच्या मनामध्ये स्थान निर्माण केले. या चित्रपटामध्ये त्यांनी एका अशा प्रेमीची भूमिका साकारली होती जो प्रेमिकासाठी नेहमी स्वतःला नुकसान पोहोचवत असतो. त्याने जोयासाठी आपल्या हाताची नस का-पून घेतली होती. धनुष एका चित्रपटासाठी ७ ते १० करोड रुपये चार्ज करतो. याशिवाय तो एंडोर्समेंटमधून देखील खूप कमाई करतो. २०११ मध्ये रिलीज झालेल्या आदुकलम साठी त्याला सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
शेफ बनायचे होतेधनुषला अभिनेता नाही तर शेफ बनायचे होत, यासाठी त्याने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करण्याचा देखील विचार केला होता. तो म्हणतो कि त्याचे वडील कस्तुरी राजा डायरेक्टर होते, जेव्हा देखील कोणताही अभिनेता त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी येत असे तेव्हा तो स्वतःला एका खोलीमध्ये बंद करून घेत असे. नंतर वडील आणि भावाच्या सांगण्यावरून त्याने चित्रपटांमध्ये नशीब आजमावले.
रजनीकांतच्या मुलीसोबत लग्नसाधारण दिसणाऱ्या धनुषने २००४ मध्ये रजनीकांतची मुलगी ऐश्वर्यासोबत लग्न केले होते. वास्तविक दोघांची भेट एका शोदरम्यान झाली होती. धनुषची बहिण ऐश्वर्याची चांगली दोस्त होती. दोघांच्या भेटण्यावरून जेव्हा मिडियामध्ये अफेयरच्या बातम्या छापू लागल्या तेव्हा दोघांच्या कुटुंबीयांनी निर्णय घेतला कि आता या नात्याला नाव दिले पाहिजे, नंतर २००४ मध्ये दोघांनी लग्न केले.
२१ व्या वर्षात लग्नधनुषने जेव्हा ऐश्वर्यासोबत लग्न केले, तेव्हा तो फक्त २१ वर्षांचा होता. तर ऐश्वर्या २३ वर्षांची होती. दोघांच्या लग्नाला १५ वर्षे झाली आहेत. दोघांना दोन मुले देखील आहेत. त्यांचा पम्पल चेन्नईमध्ये एक आलिशान बंगला आहे, याशिवाय एक गेस्ट हाउस देखील आहे. यासोबत लक्झरी कार्सचे कलेक्शन देखील आहे. हे सर्व त्याने आपल्या मेहनतीच्या जोरावर मिळवले आहे.
The post अभिनेता नाही तर शेफ बनायचे होते धनुषला, रजनीकांतच्या मुलीसोबत झाले होते प्रेम, कमी वयामध्येच कमावली अपार संपत्ती appeared first on Yesमराठी.

बॉलीवूडच्या या फेमस अभिनेत्रीला अर्ध्या रात्री मिळाली होती मसाजची ऑफर, नंतर उचलले हे मोठे पाऊल

Previous article

दुसरे लग्न करून अशाप्रकारे बदलले या ६ टीव्ही अभिनेत्रींचे आयुष्य, आज बनवली आहे आपली एक विशेष ओळख

Next article

You may also like

Comments

Comments are closed.