खेळटॉप पोस्ट

भारतीय फुटबाॅल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने केले चाहत्यांना भावनिक आवाहन

0

भारतीय फुटबाॅल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने फुटबाॅल चाहत्यांना टि्वटरवर भावनिक आवाहन करत संघाला सपोर्ट करण्यासाठी मैदानात येण्याची विनंती केली आहे. सध्या भारतीय फुटबाॅल  संघ चार देशांच्या इंटरकॉन्टिनेंटल कप 2018 स्पर्धेत खेळत आहे.

शुक्रवारी झालेल्या इंटरकॉन्टिनेंटल कपच्या सलामीच्या सामन्यात चीनी ताइपे विरुध्दच्या सामन्यात सुनील छेत्रीच्या हॅट्रिकच्या जोरावर भारतीय संघाने चीनी ताइपे संघाचा 5-0 असा पराभव केला होता. या सामन्यात केवळ 2569 प्रेक्षक उपस्थित होते.  याच सामन्यानंतर त्याने चाहत्यांना टि्वटरवर भावनिक आवाहन केले.

Loading...

सुनील छेत्री व्हिडीओ मध्ये म्हणाला की,  “मी हा व्हिडीओ तुमच्यासाठी बनवत नाहीये तर जे आज सामना बघण्यासाठी आले नाहीत त्यांचासाठी आहे. जे फुटबाॅल चाहते नाहीयेत त्यांना विंनती आहे की, त्यांनी दोन कारणांसाठी सामना बघण्यासाठी यावे. 1 – हा जगातील सर्वात प्रसिध्द खेळ आहे व 2 – आम्ही हा खेळ आपल्या देशासाठी खेळत आहोत. जर तुम्ही खेळ पाहायला आला तर मी आश्वासन देतो की, तुम्हाला हा खेळ नक्कीच आवडेल.”

सुनील छेत्री म्हणाला की, “इंटरनेटवर टिका करणे योग्य नाही. स्टेडियम मध्ये या आमच्या समोर करा. आमच्यावर ओरडा, किंचाळा. काय माहित एक दिवशी आम्ही तुम्हाला बदलून टाकू. व तुम्ही आमच्यासाठी चिअर करत असाल. तुम्हाला माहित नाही की तुम्ही आमच्यासाठी किती महत्तवाचे आहात. तुमचे समर्थन किती महत्तवाचे आहे “.

भारताचा पुढील सामना 4 जुन रोजी केनिया विरुध्द होणार आहे. हा सामना सुनील छेत्रीचा 100 वा आंतराष्ट्रीय सामना असणार आहे.

33 वर्षीय सुनील छेत्रीने आजपर्यंत आंतराष्ट्रीय सामन्यात भारताकडून खेळताना 99 आंतराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तसेच तो आंतराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक गोल करणाऱ्या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. त्याने आजपर्यंत 99 आंतराष्ट्रीय सामन्यात 59 गोल केले आहेत. या यादीत ख्रिस्तियानो रोनाल्डो 81 गोल करत प्रथम स्थानी तर लिओनिल मेस्सी 64 गोल करत दुसऱ्या स्थानी आहे.

Loading...

हा भारतीय खेळाडू करणार तब्बल 8 वर्षानंतर टेस्ट क्रिकेट मध्ये पुनरागमन

Previous article

Women’s Asia Cup: मलेशिया 27 धावांवर आॅलआउट, भारताचा 142 धावांनी शानदार विजय

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in खेळ