खेळटॉप पोस्ट

FOOTBALL: इंटरकॉन्टीनेंटल चषकावर भारताची मोहोर; चाहत्यांमध्ये उत्साह

0

मुंबई:

भारतीय फुटबॉल संघाने 2-0 असा धुवा उडवत केनियाचा अंतिम सामन्यात पराभव केला आणि इंटरकॉन्टीनेंटल चषक 2018 च्या कपवर आपली  मोहर उमटवली. मुंबई मध्ये झालेल्या ह्या अंतिम सामन्यात कॅप्टन सुनील छेत्री ने केलेल्या या  दोन गोल मुळे भारताला चषकापर्यंत जाण्याचा मार्ग सोपा झाला.

Loading...

आक्रमक मानसिकतेसह भारत हा सामान्यमध्ये उतरला होता. अनिरूद्ध थापाच्या सहाय्याने,कॅप्टन छेत्री बॉक्सच्या मध्यभागापासून  खालच्या डाव्या कोपर्‍यात गोल करीत आपला पहिला गोल नोंदवला.

त्या नंतर 29 मिनिटांनी अनस एडाथोडिकच्या सहाय्याने कॅप्टन सुनील छेत्रीने  दुसरा गोल करत भारताला सामना जिंकून दिला.

ड्रमर्सचा आवाज, टाळ्यांचा कडकडाट आणि जलोषाने यांनी मुंबई फुटबॉल एरिना येथे इंटरकांटिनेंटल चषक फायनलच्या किक-ऑफच्या दोन तास आधी सर्व डेसिबेलचा स्तर मोडला होता. चीनी तैपेईविरुद्धच्या झालेल्या सामन्यानंतर कॅप्टन सुनील छेत्रीने केलेल्या भावनिक अहवानांनंतर चाहत्यांनी स्टेडियममध्ये येऊन सामने पाहण्याला चांगला प्रतिसाद मिळाला.

प्रत्येक सामन्यात गोल करत कॅप्टन छेत्रीने संपूर्ण स्पर्धेत 8 गोल नोंदवले. छेत्रीने अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीच्या 64 गोलांची बरोबरी केली आहे आणि क्रिस्टियानो रोनाल्डोच्या गोल्सशी  बरोबरी करायला तो अगदी काही गोल्स मागे आहे.

याआधी भारताने चीन तैपेईचा 4-0 आणि केनियाचा 3-0 असा पराभव केला होता, परंतु न्यूझीलंडने 2-1 अशी मात करीत भारतवर विजय मिळवला होता.

इंटरकॉन्टीनेंटल चषक चे विजेते पद मिळवत भारताने 50000 डॉलर्सची कमाई केली आणि उपविजेत्या केनियाला 25 हजार डॉलर्स प्राप्त झाले. भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री याने  अव्वल स्थान मिळवत 7500 डॉलर्सची कमाई केली.

(PHOTO INPUT:- TWITTER/INDIAN FOOTBALL TEAM)

Loading...

Women’s Asia Cup: भारताचा पराभव करत बांगलादेशने जिंकला पहिल्यांदाच आशिया कप

Previous article

TRAILER :- सैराटचा रिमेक असलेल्या ‘धडक’चा ट्रेलर रिलीज

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

More in खेळ