टॉप पोस्टमुख्य बातम्या

#SUNDAY SPECIAL : पारंपरिक वेशभूषेपासून तर फॅशनपर्यंत…

0

पारंपरिक वेशभूषेपासून तर फॅशनकडे जाणाऱ्या सध्याच्या या काळात तरुणांनप्रमाणेच सामान्य पिढी देखील मोठया प्रमाणात पाहण्यास मिळत आहे. उमानिया टेलर अँड स्टायलीश (नांदेड सिटी) या दुकानात आल्यावर आपल्याला मोठ्या प्रमाणात हा अनुभव पाहण्यास मिळेल.

एका सामान्य घरातून आणि लहान गावातून चमेली डुंबरे यांनी पुण्यासारख्या मोठया शहरात आपले स्वप्न आणि आवडत जोपासत फॅशन डिझायनींग सारख्या क्षेत्रात आपले शिक्षण पूर्ण केले. ह्याच क्षेत्रात आपण काहीतरी करावे ह्या मार्गतून त्यांनी उमानिया टेलर अँड स्टायलीश ह्या नावाचे आपले दुकान गेल्या काही वर्षभरात सुरु केले. आधी फक्त त्या स्वतः आणि एक कारागीर हाती घेऊन त्यांनी याची सुरुवात केली, सध्याचा फॅशनचा ट्रेंड पाहता त्यांनी 11 ते 12  जणांना आपल्या दुकानातून रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली.

Loading...


त्यांच्या ह्या आगळ्या वेगळ्या अशा दुकानात आपल्याला लहानांपासून तर मोठयापर्यंत अशा सर्व वयातील महिलांसाठी असलेले कपडे  मिळतात. पारंपरिक कपड्यांपासून तर सध्याच्या नवीन फॅशनच्या साड्या देखील मोठ्या प्रमाणात पाहण्यास मिळतात.

त्या मध्ये पेशवाई, मस्तानी, महाराष्ट्रीन साडी, नऊवारी अशा अनेक पारंपरिक साड्या नवीन पद्धतीने आपल्या आवडीनुसार तयार देखील करून मिळतात.

ह्या सगळ्यामध्ये एक खास बाब अशी की महिलांना आपल्या साडी बदल जरा जास्तीच प्रेम असते तर साडीसोबात काहींच्या भावना देखील जोडल्या गेलेल्या असतात. म्हणूनच जुन्या साडीपासून नवीन ड्रेस तयार करून देणे, जेणे करून आपल्या जुन्या आठवणींना नव्याने उजाळा मिळेल अशा डिझाईन देखील येथे करून मिळतात.

यामध्ये अनेक नवनवीन फेशनचे ड्रेससे , फ्रॉकसुद्धा पाहण्यास मिळतात. पंजाब दिल्लीसारख्या मोठ्या राज्यांमधून देखील ह्या कलेला चांगली मागणी आहे. म्हणूनच सध्याच्या फेशन जगतामध्ये उमानिया टेलर अँड स्टायलीश या सारखी दुकाने आपली एक वेळी ओळख निर्माण करित आहेत.

Loading...

#MeToo मोहीम उत्तमच, पण त्याचा महिलांनी गैरफायदा घ्यायला नको – रजनीकांत

Previous article

राजुरी येथे 26 विद्यार्थींना झाली अन्नातून विषबाधा

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *