टॉप पोस्टराजकारण

सुजात बुखारींच्या मारेकर्‍यांची ओळख पटली, पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या सहभागाची शक्यता

0

जम्मू कश्मीर:-

‘रायझिंग कश्मीर’ या कश्मीर येथील वृत्तपत्राचे संपादक शुजात बुखारी यांची 14 जून ला दहशतवाद्यांकडून हत्या करण्यात आली होती.  या  हत्येप्रकरणी 3 मारेकर्‍यांची ओळख पटली आहे. त्यातील एकजण पाकिस्तानी नागरिक असून, बाकी दोघेजण दक्षिण कश्मीरमधील खेड्यातील रहिवासी आहेत.

Loading...

शुजात बुखारी इफतर पार्टीला जाण्यासाठी कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर दुचाकीवर आलेल्या तीन दहशतवाद्यांनी त्याच्यावर गोळीबार केला. यात त्यांचे 2 सुरक्षारक्षक ही मारल्या गेले. या प्रकरणात सहभागी पाकिस्तानी नागरिक हा लष्कर-ए-तेेयबाचा दहशतवादी असल्याची शक्यता आहे.

काय कैद झाले सीसीटीव्ही कॅमेरामध्ये-

या प्रकरणाचे संपूर्ण दृश्य सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाले आहे. यात दहशतवाद्यांनी आपले चेहरे हेलमेट आणि मास्कने झाकले होते. त्यांच्याकडे शस्त्रांची बॅग देखील होती. या दृशांमद्धे कैद झालेल्या चित्रफितीत दहशतवाद्यांकडून सुजात बुखारी यांच्यावर तब्बल 17 गोळ्या झाडल्याचे दिसते आहे.
यात एक चौथा संशयित बुखारी यांच्या हत्तेनंतर त्यांचा मोबाइल घेताना तो दिसला होता. परंतू आतापर्यंतच्या चौकशीत या कुणाचा काही संबंध असल्याचे स्पष्ट झालेले नाही.

दहशतवाद्यांनी बुखारींच्या खुनानंतर जोरदार घोषणा देखील दिल्याचे कळते आहे.

यात पाकिस्तानमधील एक ब्लॉगर देखील सहभागी असल्याचे समजत आहे, हा ब्लॉगर कश्मीर मधील पत्रकारांविरोधात ब्लॉग लिहितो. पोलिस या सर्व प्रकरणाबाबत संशयितांविरोधात पुरावे शोधत आहेत.

(PHOTO INPUT:- FACEBOOK/SUJAT BUKHARI)

Loading...

Hockey Champions Trophy 2018: आॅस्ट्रोलियाची भारतावर 3-2 ने मात, भारताची स्पर्धेतील पहिली हार

Previous article

Video: पाक व्याप्त कश्मीरमधील भारतीय लष्कराच्या नेतृत्वाखालील सर्जिकल स्ट्राइक

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *