Royal Entertainmentमुख्य बातम्या

अभिनेता सुबोध भावे यांच्यासह पत्नी व मुलास करोनाची लागण

0

मुंबई -राज्यभरात करोना बाधितांची संख्या वाढतच आहे. मराठी सिनेसृष्टीतही करोनाने शिरकाव केला आहे. प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे यांना करोनाची लागण झाली आहे. सुबोध यांच्यासह त्यांची पत्नी आणि मुलालाही करोनाची लागण झाली आहे. यासंर्भातील माहिती सुबोध भावे यांनी स्वतः ट्विट करत दिली आहे.
सुबोध भावे म्हणाले कि, मी, मंजिरी आणि माझा मोठा मुलगा कान्हा आम्हा तिघांनाही करोनाची लागण झाली आहे. आम्ही घरीच स्वत:ला क्वारंटाईन करून घेतले असून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने उपचार सुरू आहे. तुम्ही सगळे काळजी घ्या आणि घरी सुरक्षित रहा, असे त्यांनी सांगितले आहे. 
 

मी,मंजिरी आणि माझा मोठा मुलगा कान्हा आम्हा तिघांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
आम्ही घरीच स्वतःला quarantine करून घेतले आहे.
तज्ज्ञ डॉ च्या मार्गदर्शनाने उपचार घेत आहोत.
तुम्ही सगळे काळजी घ्या आणि सुरक्षित रहा.
गणपती बाप्पा मोरया
— Subodh Bhave (@subodhbhave) August 31, 2020

दरम्यान, मागील काही दिवसांमध्ये सुबोध भावे सोशल मीडियावर लहान मुलांसाठी कथा-गोष्टी ऑनलाइन स्वरुपात सांगत आहे. या कथा फार कमी वेळेतच लहान मुलांमध्ये लोकप्रिय झाल्या आहेत.
 

 

View this post on Instagram

 

A post shared by Subodh Bhave (@subodhbhave) on Aug 21, 2020 at 11:33pm PDT

The post अभिनेता सुबोध भावे यांच्यासह पत्नी व मुलास करोनाची लागण appeared first on Dainik Prabhat.

सनी लियोन झळकली मेरिट लिस्टमध्ये

Previous article

इंस्टाग्रामला मंदाना करीमीचा “बाय बाय’

Next article

You may also like

Comments

Comments are closed.