मुख्य बातम्या

ड्रग्ज प्रकरणातील संशयित कलाकारांचे तात्काळ शुटिंग थांबवा नाहीतर…; आठवलेंनी दिला कडक इशारा

0

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासातून ड्रग्ज रॅकेट समोर आल्यानंतर आता नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो सक्रिय झाला आहे. या प्रकरण सुशांतची मैत्रिण रिया चक्रवर्तीला अटक झाल्यानंतर दीपिका, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांचीही नावं समोर आली आहेत. यावरून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी या कलाकारांना व निर्मात्यांना इशारा दिला आहे.

ड्रग्स अंमलीपदार्थ घेणारे म्हणून नार्को विभागाने कारवाई केलेल्या कलाकारांना निर्मात्यांनी त्यांच्या चित्रपटात घेऊ नये; अन्यथा त्यांच्या चित्रपटाचे चित्रीकरण आरपीआय बंद पाडेल तसेच अशा चित्रपटांना प्रदर्शित होऊ देणार नाही. pic.twitter.com/GYTj7P8qef
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) September 26, 2020

सुशांतनं आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली याचा तपास सीबीआय करत असतानाच या प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं आहे. या प्रकरणात आता एनसीबी पथकानंही काही कलाकारांवर कारवाई केली आहे.
तसंच, बॉलिवूडमधील अन्य कलाकारांवरही एनसीबी पथकाची करडी नजर आहे.यावरूनच रामदास आठवले यांनी ड्रग्ज प्रकरणात नावं समोर आलेल्या कलाकारांना ब्लॅक लिस्ट करत चित्रपट निर्मात्यांना त्यांना यापुढं चित्रपटात काम न देण्याचं आवाहन केलं आहे. जर, निर्मात्यांनी तसं न केल्यास आरपीआयचे कार्यकर्ते चित्रकरण बंद पाडतील, असा सूचनावजा इशारा त्यांनी दिला आहे
महत्वाच्या बातम्या :-

ठाकरे सरकारची आंधळं दळतय आणि कुत्रं पीठ खातंय अशी अवस्था ; मेटेंचा गंभीर आरोप
चिंताजनक : पुण्यात गेल्या 24 तासांत १,६२१ कोरोनाबाधितांची वाढ !
रिया तुरुंगात ! सारा, श्रद्धा, दीपिकाचं काय होणार ?
मराठा समाजाला नक्कीच आरक्षण मिळवून देणार ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आश्वासन
“बिहारमध्ये विकासाचे मुद्दे नव्हते म्हणून भाजपकडून सुशांत प्रकरणाचं राजकारण”

inshortsmarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. ड्रग्ज प्रकरणातील संशयित कलाकारांचे तात्काळ शुटिंग थांबवा नाहीतर…; आठवलेंनी दिला कडक इशारा InShorts Marathi.

स्थानिक प्रशासनाच्या आशिर्वादाशिवाय ड्रग्सचा पुरवठा होवू शकत नाही ; रवीना टंडनचा सूचक टोला

Previous article

पवारांसोबत राहून राऊतांना कोलांट्या मारण्याची सवय झालीय ; भाजपची खोचक टीका

Next article

You may also like

Comments

Comments are closed.