टॉप पोस्टराजकारण

जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत -भाजप खासदार

0

हरियाणामधील भाजपचे राज्यसभेचे खासदार व रिटायर लेफ्टिनेंट जनरल डॉ डीपी वत्स यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्या लोकांना गोळ्या घालायचा सल्ला दिला आहे. न्यूज एजेन्सी एएनआईच्या नुसार ते म्हणाले के, मी दगडफेक करणाऱ्यांच्याविरुध्द असलेले खटले मागे घेण्याची बातमी वाचली; पण मला वाटतं की, दगडफेक करणाऱ्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत.

मागील आठवड्यातच जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्थेची माहिती घेण्यासाठी श्रीनगरला गेलेल्या केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी  दगडफेकीच्या घटनेमध्ये सहभागी असणाऱ्यांच्या वरील गुन्हे मागे घेण्याची घोषणा केली होती. ते म्हणाले होते की, मुलांची सहजपणे दिशाभूल केली जाऊ शकते. आम्हाला सत्य काय आहे ते माहित आहे त्यामुळे दगडफेक करणाऱ्यांवरील सर्व गुन्हे मागे घेत आहोत.

Loading...

रिपोर्टनुसार, जम्मू-काश्मीर सरकारने या वर्षीच्या फेब्रूवारी महिन्यात 2008 ते 2017 मधील घडलेल्या दगडफेकींच्या घटनामध्ये सहाभागी असणाऱ्या लोकांवरचे गुन्हे काढण्याची ही पहिलीच वेळ आहे.

गृहमंत्र्यांनी सांगितल्यांनतर कृषीं मंत्री गुलाब नबी लोन हंजूरा म्हणाले की, या मध्ये शोपियामधील 530 लोकांवरील 61  एफआईआरचा देखील यात  समावेश आहे. तसेच त्यांनी माहिती दिली की, काश्मीरमध्ये मागील तीन वर्षात 14,203 दगडफेक करणाऱ्यांवर 4,066 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

(PHOTO INPUT :- FACEBOOK)

Loading...

लोकसेवा आयोगाची परीक्षा पास न होताच प्रशासकीय सेवेत होणार थेट भरती; केंद्र सरकारचा निर्णय

Previous article

SCO: शांघाय सहकार्य परिषदेमध्ये भारताचा ‘बीआरआय’ला विरोध

Next article

You may also like

Comments

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *